शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री अन् सरकारचा दुष्काळाबाबत 'अभ्यास कमी', विधानभवनात धनंजय मुंडे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:21 IST

धनंजय मुंडेंनी दुष्काळी परिस्थीतीवर बोलताना, सरकारची दुष्काळाबाबतची धोरणं चुकीची असल्याचं म्हटलंय.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन आज सरकारला कोंडीत पकडलं. यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षा गंभीर आहे. कारण, 72 साली एक वर्षांचा दुष्काळ होता. आता, शेतकरी 4 वर्षांपासून दुष्काळ सोसत आहे, कधी कोरडा दुष्काळ कधी नोटाबंदीमुळे तर कधी बोन्डअळीमुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहेत. मात्र, सुरुवातीपासून सरकार दुष्काळ हाताळण्यास अपयशी, ठरल्याचं मुंडें यांनी म्हटलं 

धनंजय मुंडेंनी दुष्काळी परिस्थीतीवर बोलताना, सरकारची दुष्काळाबाबतची धोरणं चुकीची असल्याचं म्हटलंय. तसेच माझी ही सरकारवर टीका नसून सूचना समजावी, असा टोलाही त्यांनी लगावला. कदाचित मुख्यमंत्री आणि सरकारचा दुष्काळाबाबत अभ्यास कमी पडला आहे. तर, दुष्काळ संहिता म्हणजे पोरखेळ आहे. 2016 ची संहिता 200 मंडळात दुष्काळ का मान्य करत नाही. केंद्राची सन 2016 ची दुष्काळ संहिता राज्याच्या हिताची नव्हती, ती शासनाने का स्वीकारली? असा सवालही मुंडेंनी सरकारला विचारला आहे. मी स्वतः जानेवारी 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, भेटलो आणि सांगितले की "केंद्राची सन 2016 ची दुष्काळ संहिता राज्याच्या हिताची नाही. इतर राज्यांप्रमाणे ती नाकारा, तरी याबाबत सरकार काहीच करत नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सभागृहाला उत्तर द्यावे, अशी मागणी मुंडे यांन केली.

दुष्काळाबाबत अनेक तज्ञ, प्रसारमाध्यमं यांनी याची गंभीरता सरकारपुढे वेळोवेळी मांडली. पण, निर्ढावलेलं सरकार कोणाचीही दखल घ्यायला तयार नाही. मी दिलेल्या पत्राची साधी पोच सरकारने दिली नाही. यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे लक्षात येईल, असा आरोपही धंनजय मुंडेंनी केला. मराठवाड्यातील 50% पेक्षा अधिक धरणं कोरडी पडली आहेत. सध्याच्या दुष्काळ संहितेमुळे आगामी काळात राज्याला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने 151 तालुके सध्या दुष्काळग्रस्त जाहीर केले. पण हे केंद्राच्या संहितेप्रमाणे आता केंद्रीय पथक येऊन निरीक्षण करेल. मग त्या तालुक्यांचा दुष्काळ कायम ठेवायचा की नाही याबाबत निर्णय होईल. त्यामुळे सरकार दुष्काळाबाबत जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेdroughtदुष्काळMumbaiमुंबई