छत्तीसगडमधल्या आरोपीनं अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, दोन वर्षांनंतर प्रकरण उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 16:32 IST2017-10-01T16:31:47+5:302017-10-01T16:32:46+5:30

रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर रायपूर (छत्तीसगड) मध्ये एका आरोपीने बलात्कार केला. दोन वर्षांनंतर या प्रकरणाची पीडित मुलीने वाच्यता केली.

Chhattisgarh accused of raping a minor girl, two years after the case was exposed | छत्तीसगडमधल्या आरोपीनं अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, दोन वर्षांनंतर प्रकरण उघडकीस

छत्तीसगडमधल्या आरोपीनं अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, दोन वर्षांनंतर प्रकरण उघडकीस

नागपूर : रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर रायपूर (छत्तीसगड) मध्ये एका आरोपीने बलात्कार केला. दोन वर्षांनंतर या प्रकरणाची पीडित मुलीने वाच्यता केली. त्यामुळे सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी सध्या १३ वर्षांची आहे. ती कोंढाळीची रहिवासी आहे.

मुलीच्या कुटुंबीयांची स्थिती हलाखीची आहे. तिचे वडील सूरत (गुजरात) मध्ये गवंडी काम करतात. १ जानेवारी २०१५ ला रागाच्या भरात घरून निघून आली. नागपूरला पोहोचल्यानंतर येथून ती रेल्वेने रायपूरला गेली. तेथे दुपारी ४ ते ६ या वेळेत ती रस्ता विसरल्याने इकडे तिकडे भटकू लागली. ते पाहून एका अज्ञात आरोपीने तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला काही सदगृहस्थ भेटले. त्यांनी तिची कैफियत ऐकल्यानंतर तिला रायपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी तिची सुधारगृहात रवानगी केली. दरम्यान, ती नागपूरची असल्याचे माहीत पडल्याने रायपूर पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तिला नागपुरात आणले. दोन वर्षांपासून ती सदरमधील एका सुधारगृहात राहते. तिने लहानशा वयात रागाने घर सोडले म्हणून तिच्या पालकांनीही तिला वा-यावर सोडल्यासारखे केले आहे. तिला येथे तिचे आईवडील भेटायला येत नाही. केवळ आजोबाला तिचा लळा आहे. ते तिला नेहमी भेटायला येतात.

Web Title: Chhattisgarh accused of raping a minor girl, two years after the case was exposed