शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, विरोधकांचे मुंबईत जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 07:04 IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे.

मुंबई - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करणार असून त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होतील.

मविआतर्फे सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. तर २ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुक्यातही हे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्याच्या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आदी नेते सहभागी होणार आहेत,

भाजपचे ज्येष्ठ नेतेही उतरणार आंदोलनातछत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली आहे. नव्याने दिमाखदार पुतळा त्या ठिकाणीच उभारण्याचा निर्धार सरकारने केला आहे. असे असताना विरोधक केवळ या दुर्घटनेचे राजकारण करत असल्याची भूमिका घेत प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या वतीने रविवारी प्रत्युत्तरादाखल राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री अतुल सावे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आंदोलनात सहभागी होणार आहेत.

डॉ. चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडीमालवण (जि. सिंधुदुर्ग): राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम रचनाकार सल्लागार डॉ. चेतन पाटील याला शनिवारी न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.पुतळ्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, बांधकाम रचनाकार सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या विरोधात सदोषवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमांतर्गत येथील पोलिस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी यातील डॉ. चेतन पाटील याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कोल्हापूर येथून ताब्यात घेत शुक्रवारी येथे आणले. शनिवारी दुपारी कडेकोट बंदोबस्तात त्याला न्या. एम. आर. देवकाते यांच्या कोर्टात हजर केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजsindhudurgसिंधुदुर्गMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा