शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते; गुजरातच्या भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:26 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं सांगून भाजपा नेत्यांनी शिवप्रेमी जनतेची नाराजी ओढावून घेतली आहे.

मुंबई - राज्यात २९ महापालिका निवडणुका सुरू आहेत. त्यातच भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान करत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते सी.आर.पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. सूरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात बोलताना पाटलांनी हे विधान केले. मात्र सी.आर.पाटील यांच्या विधानावरून महाराष्ट्रातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

सी.आर पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते त्याचा मला आनंद आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा यशस्वी प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलं आहे. सी.आर पाटील यांनी हे विधान अशावेळी केले आहे जेव्हा महाराष्ट्रात २९ महापालिका निवडणुका आहेत. त्यात मुंबई महापालिकेत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत असा आरोप विरोधक सातत्याने सत्ताधारी महायुतीवर करत आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं सांगून भाजपा नेत्यांनी शिवप्रेमी जनतेची नाराजी ओढावून घेतली आहे.

याबाबत खासदार संजय राऊत यांनी कडाडून समाचार घेतला आहे. मी सी.आर पाटील यांचे भाषण ऐकले. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजराती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे आणि मराठा साम्राज्याचे राजे आहेत. हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा फार मोठा अपमान आहे. अनेक युगपुरुष भारतीय जनता पार्टीने पळवायचा प्रयत्न केला. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर हे पळवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी आता छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवायचा प्रयत्न करत आहेत अशी टीका राऊतांनी केली. 

कोण आहेत सी.आर पाटील?

गुजरातमधील चंद्रकांत पाटील यांना सी.आर पाटील म्हणून ओळखले जाते. ते गुजरातच्या राजकारणातील भाजपाचा प्रमुख चेहरा आहेत. सध्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर जलशक्ती मंत्रालयाची जबाबदारी आहे. गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू अशी सी.आर.पाटील यांची ओळख आहे. त्यांचे मूळ गाळ महाराष्ट्रातील जळगाव येथे असले तरी संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कारकिर्द गुजरातमध्येच घडली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Controversial claim: Shivaji Maharaj belonged to Patidar community, says BJP leader.

Web Summary : BJP leader C.R. Patil's claim that Shivaji Maharaj belonged to the Patidar community sparked outrage in Maharashtra. Sanjay Raut criticized Patil, alleging an attempt to portray Shivaji Maharaj as Gujarati, insulting Maharashtra.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतMaharashtraमहाराष्ट्रBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६