छत्रपती संभाजीराजेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे 'निशाणा'; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 08:14 PM2020-10-21T20:14:14+5:302020-10-21T20:29:47+5:30

शेतातली उभी पिके आणि मातीही वाहून गेली आहे. मग जागेवर जाऊन पंचनामे तरी कशाचे करणार आहात?

Chhatrapati Sambhaji Raje indirectly 'targets' Chief Minister Uddhav Thackeray; Said ... | छत्रपती संभाजीराजेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे 'निशाणा'; म्हणाले...

छत्रपती संभाजीराजेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे 'निशाणा'; म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देअतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजेंचा पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद

पुणे : राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहे. तर उभी पिके आणि माती सुद्धा वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. मी चिखल, ट्रॅक्टर, बैलगाडीमधून दौरा केला त्यामुळे माझे दौरे हे ग्राऊंडवर आहेत. फक्त हायवेवर पाहणी करून मी निघून गेलो नाही, अशा शब्दात छ. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज घ्यावे लागले तरी हरकत नाही. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करायला हवा. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक पाहणीला येऊ शकत नाही. त्यामुळे राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. रब्बीसाठी बँकासुद्धा आता कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला तर कर्ज मिळू शकणार आहे. 

 छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मी मोठा कृषीतज्ज्ञ नाही याची मला कल्पना आहे. मी कोणावर टीकाही करणार नाही. खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महारांचा वंशज म्हणून शेतकऱ्यांसाठी ही मागणी केली आहे. शिवरायांनी शेतीवर आलेल्या संकटावेळीही कर्जाचा विचार केलेला नव्हता. त्याचे दाखले इतिहासात आहेत. त्यामुळे या सरकारनेही कर्जाचा विचार करु नये. शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे. 

राज्य सरकारने प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी. यासोबतच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळेल असे पाहावे याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. 
=====
पंचनामे कशाचे करणार?
शेतातली उभी पिके आणि मातीही वाहून गेली आहे.  मग, जागेवर जाऊन पंचनामे तरी कशाचे करणार आहात? असा प्रश्न विमा कंपन्यांना त्यांनी केला. विमा कंपन्यांनी जाचक अटी व नियम शिथिल कराव्यात अशी मागणी देखील संभाजीराजे यांनी केली आहे. 
====
 

Web Title: Chhatrapati Sambhaji Raje indirectly 'targets' Chief Minister Uddhav Thackeray; Said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.