शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

उल्हासनगरात चादर गँगची दहशत, 56 लाख रुपयांचे मोबाइल चोरीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:07 PM

साऊंड ऑफ म्युझिक मोबाइल दुकानातून रविवार पहाटे 5 वाजता तब्बल 56 लाख रुपयांचे मोबाइल चादर गॅंगने लंपास केलेत. 

उल्हासनगर - साऊंड ऑफ म्युझिक मोबाइल दुकानातून रविवार पहाटे 5 वाजता तब्बल 56 लाख रुपयांचे मोबाइल चादर गॅंगने लंपास केलेत. कॅम्प नं-3 परिसरातील ही घटना आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. व्यापाऱ्यांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर कॅम्प नं- 3 परिसरात मोबाइल मार्केट असून शिवाजी चौकात साऊंड ऑफ म्युझिक मोबाइलचे दुकान आहे. रविवारी पहाटे 5 वाजता 6 जणांच्या टोळीने चादर टाकून दुकानाचे शटर तोडुन विविध कंपनीचे तब्बल 56 लाख रुपयांचे मोबाइल लंपास केले.

सकाळी 10 वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दुकानाचे मालक लक्ष्मण गंभानी यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने तपास सुरू केला आहे. तसेच तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळदाते पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चादर गॅंगमधील 6 जणांची ओळख पटविण्यात येत आहे. गॅंग लवकरच जेरबंद होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले असून व्यापाऱ्यांत मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीMobileमोबाइल