शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या शेतीमध्ये रासायनिक माती

By admin | Updated: October 27, 2014 02:22 IST

नवी मुंबईतील खैरणा येथील आडवली भुतालीतील आदिवासी शेतकऱ्यांवर तेथील शेटजींनी सुरू केलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडली

अजय महाडिक, मुंबईनवी मुंबईतील खैरणा येथील आडवली भुतालीतील आदिवासी शेतकऱ्यांवर तेथील शेटजींनी सुरू केलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडली असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून ठाणे महसूल प्रशासनाने मात्र बघ्याचीच भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना शेती करता येऊ नये, म्हणून शेतजमिनीवर टाकला जात असलेला भराव रसायनमिश्रित असल्याचा लेखी निर्वाळा राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स, चेंबूर यांनी दिला आहे.रसायनमिश्रित भरावामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा बाबजी मोहरा यांनी ‘लोकमत’कडे मांडली. शेटजीने स्वत:ला खोट्या कागदपत्रांच्या आधारे शेतकरी भासवून ही जमीन लाटली आहे. ठाण्यातील महसूल प्रशासनाचे सरकारी बाबूही त्यांच्याच ताटाखालचे मांजर झाल्याचे चित्र आहे. याबाबत ‘लोकमत’ने आदिवासी शेतकऱ्यांची बाजू मांडली असून, या प्रकरणाची भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दखल घेतली आहे.पिढ्यान्पिढ्या ज्या जमिनींवर शेती केली, त्या जमिनीवर बिनशेती विकासासाठी सोसायटी स्थापन झाल्याने बेघर होण्याची पाळी येथील ३३ आदिवासी कुटुंबांवर आल्याची बातमी दि. २६ जुलै २०१४च्या अंकात देण्यात आली होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हा घटनाक्रम असून, वास्तविक ज्या उद्देशाने सोसायटी स्थापन झाली त्यालाच फाटा देत ती जमीन व्यावसायिक कंपनीला विकू न आदिवासी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्यात आल्याचे वास्तव मांडण्यात आले होते.असा झाला अन्याय़़़वास्तविक फेरफार क्रमांक २२३, २२४, दि. ३० एप्रिल १९५६ला सर्व्हे नंबर २३/२, २८/१, २८/१ पै २८/२, २९/२, २९/२ पै, ६०/पै ही जमीन अनुक्रमे हुकूम नंबर टीएनसी एसआर - १ दि. २२ जानेवारी १९५४ व मुंबई सरकारचा महसूल विभागाचा ठराव क्रमांक २२५२/४९ दि. २७ फेब्रुवारी हुकूम नंबर टीएनसी एसआर ४० प्रमाणे संरक्षित कूळ व साधं कूळ म्हणून गोपाळ रामा मोहरा यांच्या नावे दाखल करण्यात आले. कागदपत्रांवरून १९५२ ते १९९८पर्यंत या संपूर्ण जमिनीवर मोहरा व त्यांचे कुटुंबीय भातशेती करीत होते. असे असताना शेतसारा नोंद १९९३पर्यंत दाखविण्यात आली. पुढे ही जमीन कागदोपत्री ओसाड दाखवून मयूरेश सिप्रॉनि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतली. दरम्यान, हा खरेदी व्यवहार करताना १९९७ साली कंपनीचे भागीदार बाळकृष्ण बबन जाधव व गोपाळ जुगलकिशोर बरसीया यांनी शेतकरी असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून हा व्यवहार पूर्ण केला आहे.