शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

राज्य सरकारकडून सीएचबी प्राध्यापक नियुक्ती प्रस्तावाला मिळेना मान्यता; महाविद्यालयात प्राध्यापकांचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 11:08 IST

राज्यातील विद्यापीठातील व महाविद्यालयांमध्यील प्राध्यापकांची सुमारे ३० ते ४० हजार पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देमहिन्याभरापूर्वी शासनाकडे पाठविला प्रस्तावगेल्या आठ-दहा वर्षात सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागा अद्यापही रिक्तच

राहुल शिंदेपुणे: राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत.परिणामी महाविद्यालयात तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची नियुक्ती करून महाविद्यालयीन शैक्षणिक कामकाज चालविले जात आहे. परंतु,शासनाने सर्वच भरती प्रक्रियेवर बंदी घातली आहे.त्यामुळे सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीवरही परिणाम झाला असून उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव सुमारे महिन्याभरापासून शासनाकडे पडून आहे.      राज्यातील विद्यापीठातील व महाविद्यालयांमध्यील प्राध्यापकांची सुमारे ३० ते ४० हजार पदे रिक्त आहेत. राज्यात २०१२ पासून प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरळीतपणे राबविली गेली नाही. गेल्या आठ-दहा वर्षात सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे काही महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील महत्त्वाच्या विषयांना एकही पूर्णवेळ प्राध्यापक नाही,अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाविद्यालयांना तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मदतीने शैक्षणिक कामकाज पूर्ण करावे लागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विना अनुदानित महाविद्यालयांमधील सीएचबीवरील प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव येत्या ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहे.तर अनुदानित महाविद्यालयांमधील सीएचबी प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव वर्षभर स्वीकारले जातील,असे परिपत्रक विद्यापीठाच्या शिक्षक मान्यता कक्षातर्फे 13 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.मात्र,मान्यता नसली तरी काही प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत.त्यामुळे या प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.   एम.फुक्टोचे सचिव प्रा.एस.पी.लवांडे म्हणाले, प्राध्यापकांची पूर्णवेळ नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाने तात्पूरती व्यवस्था म्हणून सीएचबीवरील प्राध्यापकांच्या नियुक्तीचा मार्ग स्वीकारला.आता सीएचबी प्राध्यापकांची भरतीही केली नाही तर महाविद्यालयांचे कामकाज करणे शक्य होणार नाही.त्यामुळे शासनाने तात्काळ सीएचबी प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी द्यावी.-------------------------------------------कोरोनामुळे अनेक महाविद्यालयांनी आॅनलाईन पध्दतीने शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.मात्र,राज्य शासनाने सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीला मान्यता न दिल्या महाविद्यालयांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे शासनाने त्वरीत सर्व सहसंचालक कार्यालयांमार्फत महाविद्यालयांना सीएचबी प्राध्यापक नियुक्तीचे आदेश द्यावेत.- प्रा.प्रकाश पवार,अध्यक्ष,शिक्षक हितरकारिणी संघटना,------------------------------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकार