शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचेही गजा मारणे कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 10:26 IST

Chandrakant Patil meet Gangster Gaja Marane : चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil meet Gangster Gaja Marane : पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी (दि.२७) झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गजा मारणे याने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. त्यामुळं वाद निर्माण झाला होता. यानंतर आता गजा मारणे याने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला आहे. यावरून कुख्यात गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी दहीहंडी उत्सव राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. पुण्यातील कोथरूड भागातही हमराज सार्वजनिक उत्सव मंडळानेही दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या दहीहंडी कार्यक्रमात कुख्यात गुंड गजा मारणे याने भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या नियोजित दौऱ्यात या मंडळाचा आधी कुठेही समावेश नव्हता. तरीही चंद्रकांत पाटील ऐनवेळी तिकडे कसे गेले? तसंच, गजा मारणेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही चंद्रकांत पाटील यांनी त्याच्याकडून सत्कार का स्वीकारला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गजा मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. तर चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारल्याची चर्चा आता रंगताना दिसत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावरून विरोधक सत्ताधारी भाजपवर निशाणा साधतील. दरम्यान, याबाबत चंद्राकांत पाटील काय प्रतिक्रिया देतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गजा मारणेसोबत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट! यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कोथरूडमध्ये गजा मारणे याची भेट घेतली होती. यानंतर पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून राजकीय वर्तुळात टीका झाल्यानंतर ही अतिशय चुकीची गोष्ट घडली, अशी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले होते की, गजा मारणेशी झालेली भेट ही फक्त अपघात होता. गजा मारणेची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवार