Chandrakant Patil Exclusive : अमित शाहंची लगीनगाठ खरंच चंद्रकांतदादांनी बांधली?; ऐका 'लग्नाची गोष्ट' त्यांच्याचकडून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:07 IST2021-10-30T13:07:28+5:302021-10-30T13:07:50+5:30
Chandrakant Patil Amit Shah : अमित शाह यांची लगीनगाठ बांधण्यामागे खरंच चंद्रकात पाटील यांचा रोल होता, अशी अनेकांची धारणा आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर.

Chandrakant Patil Exclusive : अमित शाहंची लगीनगाठ खरंच चंद्रकांतदादांनी बांधली?; ऐका 'लग्नाची गोष्ट' त्यांच्याचकडून...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. तर दुसरीकडे अमित शाह यांची लगीनगाठ ही चंद्रकांत पाटील यांनीच बांधली अशी अनेकांची धारणा आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलखुलासपणे उत्तर दिलं. अमित शाह यांच्या पत्नी कोल्हापूरच्या असल्या तरी त्याचा आणि अमित शह यांच्याशी असलेल्या संबंधाचा काहीच संबंध नाहीये असं ते म्हणाले. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से पाटील मनमोकळेपणानं बोलले.
"१९८२ मध्ये माझ्याकडे विद्यार्थी परिषदेचं गुजरातचं काम आलं होतं. अमित शाह त्याच वेळी भाजपकडे जात होते. ते गुजरातचे विद्यार्थी परिषदेचे सेक्रेटरीही होते. त्या ठिकाणी आमची पहिल्यांदा ओळख झाली. ते कोल्हापूरचे जावई आहेत याबद्दल मला नंतर समजलं. त्यांचं लग्न मी जमवण्यासारखा काहीच प्रश्न नाही," असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांचं लग्न जुळवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
९५ पर्यंत गुजरातची जबाबदारी
"१९८२ ते १९९५ या कालावधीदरम्यान माझ्याकडे गुजरातची जबाबदारी होती. दर चार महिन्यांनी महाराष्ट्र गुजरात असा राऊंड असायचा. त्यावेळी गुजरातमध्ये गेल्यानंतर अमित शाह यांची भेट व्हायची. संघटनेत पूर्णवेळ कार्यकर्त्यांना पॅरेंट (पालक) देण्याची पद्धत आहे आणि गुजरातमध्ये काम करणाऱ्यांचे पालक हे अमित शाह होते. प्रवासी कार्यकर्त्यांनी या पालकांची भेट घ्यायची असते. अशाप्रकारे तो परिचय वाढत गेली," असं पाटील म्हणाले.
जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यानंतर २०१४ च्या निवडणुका आल्या. युती होणार की नाही अशी चर्चाही होती. अमित शाह देवी अंबाबाईचे भक्त आहेत. ते अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. त्यापूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणार की नाही अशी चर्चाही होती. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी गणपतीच्या दिवसांमध्ये मी अमित शाह यांनी युती नंतर पाहू मुंबईत आलात तर मातोश्रीवर गणपतीसाठी तुम्हाला जावं लागेल असं सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी निवेदन दिलं तर जाईन असं ते म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी संवाद साधला आणि त्यांनी आमंत्रणही दिलं. त्यानंतर त्यांना भेटण्याचे फायदेही लक्षात आले. त्यानंतर महाराष्ट्रात गोष्टींमध्ये ते गृहित धरू लागल्याचंही पाटील म्हणाले.
सरकार आल्यानंतर त्यांनी मंत्रिपद घेण्यासही सांगितलं. त्यानंतर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, असे अनेक प्रसंग आले. त्यांनी जबाबदारीही दिली. त्याची सुरूवात कोल्हापूर नाही, तर अहमदाबाद आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.