शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

चंद्रकांतदादांनी कन्नड अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 10:06 PM

महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.

बेळगाव : महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारची कन्नडसक्ती सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्र्यानेच कन्नडमधून गीत गायल्याने नवा वाद सुरू झाला आहे.तवग येथे शुक्रवारी सायंकाळी दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे होते. यावेळी बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी ही या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चंद्रकांतदादा यांनी कन्नडमधून ‘जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे’(हुट्टीदरे कन्नड नल्ली हुट्टबेकु) हे दाक्षिणात्य अभिनेता राजकुमारचे गीत गायले. हे गीत गाऊन कन्नड लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले, गेली 61 वर्षे बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड, मराठी भाषिक एकीनेच राहत आहेत, अशात भाषाभेद कसला करता, सीमावाद असला तरी एकीने, सौहार्दाने राहावं, असा सल्लाही उपस्थितांना दिला.दरम्यान, चंद्रकांतदादा यांनी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याबद्दल सीमाभागातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. मराठी युवा मंच एकीकरण समितीने याचा निषेध केला. समितीने म्हटले आहे की, गोकाकमधील कन्नड लोकांना खूश करण्यासाठी आपण गीत म्हटलं; मात्र आपण समन्वयक मंत्री म्हणून बेळगावात मराठी लोकांत एकदाही गेलेला नाहीत. मराठीचा द्वेष करणा-यांच्या कार्यक्रमात जाऊन कन्नडमध्ये गीत गाण्याची कृती सीमाभागातील मराठी जनांच्या भावनांवर मीठ चोळणारी आहे. सीमाप्रश्नाबाबत आपणाला किती गांभीर्य आहे हे कळून चुकलं आहे या शब्दात त्यांचा निषेध केला आहे. बेळगावातील सोशल मीडियात देखील पाटील यांचा निषेध केला जात आहे.चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी व्यक्ती समन्वयक म्हणून नेमावी. भाजपचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे या कृतीवरुन समजते.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत कर्नाटकातील कन्नड लोकांना खूश करून मते मिळविण्यासाठी मराठीजनांच्या भावना दुखावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.- राजू पावले, येळ्ळूर विभाग समितीचे एकीकरण समितीचे कार्यकर्ते.भाजपच्या जाहिरातबाजीसाठीच.........कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांतदादांनी कन्नड गीत आळवले; पण सीमाभागात याच कन्नडजनांच्या लाठ्या खाऊन मराठीजन विव्हळत आहेत याची जाण त्यांना राहिली नाही अशा प्रतिक्रिया मराठी भाषकांतून येत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील