शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांच्या घरावर सीमावासीयांचा मोर्चा, पोलिसांशी झटापट; बेळगावच्या माजी महापौर, उपमहापौरांसह २६ ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:17 IST

कन्नड अभिमान गीत गाऊन कर्नाटकची स्तुती करणा-या महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न सीमाभागातील नागरिकांनी मंगळवारी केला.

कोल्हापूर : कन्नड अभिमान गीत गाऊन कर्नाटकची स्तुती करणा-या महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न सीमाभागातील नागरिकांनी मंगळवारी केला. मंत्री पाटील यांच्या घरापासून काही अंतरावरच पोलिसांनी हा मोर्चा अडविला. यावेळी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करणा-या आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी बेळगावच्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह २६ आंदोलकांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.महाराष्टÑ एकीकरण समितीचे कार्यकर्ते मंगळवारी बेळगाव, निपाणी येथून आले होते. ते संभाजीनगर परिसरातील मंत्री पाटील यांच्या घराकडे मोर्चाने निघाले. संभाजीनगर झोपडपट्टीजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा मोर्चा अडविला. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने सुरू केली. काही आंदोलक पोलिसांचे कडे तोडून पुढे जाऊ लागले. यावेळी पोलीस व आंदोलकांदरम्यानझटापट झाली. काही आंदोलक रस्त्यावर झोपले. त्यांना अक्षरश: उचलून पोलिसांनी व्हॅनमध्ये घातले.आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या प्रमुख, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, रूपा नावलेकर, मदन बामणे, सूरज कणबरकर, पीयूष हावळ, सुनील बाळेकुंद्री, अमर येल्लूरकर आदींनी केले.ही तर दडपशाही-चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केले, त्याचा निषेध करण्याकरिता येथे आलो. पोलिसांनी सुरुवातीला तुम्ही आमचेच आहात असे म्हणत आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेतले. आंदोलन करू दिले नाही. पोलिसांची ही दडपशाही असल्याचे बेळगावचे माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलKarnatakकर्नाटक