शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 19:33 IST

येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता

ठळक मुद्देरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २ व ३ जुलैला अतिवृष्टीचा इशारा

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येत्या २ व ३ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ३ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवसांनी कोकणात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.गेल्या २४ तासात कोकणातील वेंगुर्ला १००, लांजा ६०, अलिबाग, देवगड, कणकवली, मालवण, म्हापसा, माथेरान, सावंतवाडी ५०, मुंबई (सांताक्रुझ), रामेश्वरी ४०, दोडामार्ग, कुडाळ, मुरुड, केपे, राजापूर, तळा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रातील इंदापूर ९०, मेढा ८०, अमळनेर, चोपडा, माळशिरस ६०, गगनबावडा ५०, दहिवडी माण, नांदगाव, पंढरपूर ४०, बार्शी, मालेगाव, मंगलवेढा, पारोळा, फलटण ३० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यातील गंगापूर ९०, कन्नड ५०, देवणी हदगाव, फुलंब्री, रेणापूर, सिल्लोड ४०, अंबेजोगाई, आष्टी, बीड, भोकरदन, चाकूर, गेवराई, पाटोदा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबरच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. विदभार्तील लोणार, मालेगाव, सिंधखेड राजा ३०, आमगाव, देऊळगाव राजा, दिग्रस, गोरेगाव, लाखंदूर, मंगळुरपीर, मानोरा, नांदगाव काजी, पातूर, रिसोड, साकोली, सावनेर २० मिमी पाऊस झाला होता.३० जून रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.१ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ २ व ३ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. .........इशारा : २ व ३ जुलै रोजी रायगड, रत्नगिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ पालघर, मुंबई, ठाणे, धुळे, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात ३ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात २ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून ३ जुलै रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ