शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जेजुरी गडावर धार्मिक वातावरणात चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 19:15 IST

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला. 

जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी करवीरपिठाचे आध्य शंकराचार्य (विद्यानृसिंह भारती) व सह धमार्दाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांचे हस्ते विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला. 

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा रविवारी सकाळचे सुमारास मुख्य मंदिरात पाकळणीला सुरुवात करण्यात आली. मार्तंड भैरवनाथासह उत्सव मूर्तींची पूजा अभिषेक करून नवीन पोशाख परिधान करण्यात आला. देवसंस्थानच्या वतीने मूर्तींना आभूषणे अलंकार परिधान करण्यात आले. तत्पूर्वी पुणे येथील भाविक जगताप,  नाईक व गोवेकर यांच्या वतीने मुख्य मंदिर, गाभारा, व घटस्थापना स्थळ (बालद्वारी ) आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. तर येवला येथील कापसे या भाविकांनी अर्पण केलेली पैठणी म्हाळसादेवी, बाणाईदेवी मूर्तींना परिधान करण्यात आली. मुख्य मंदिरातील पाकाळणी, पूजा अभिषेक विधीनंतर अलंकाराने मढविलेल्या उत्सवमूर्ती सनई -चौघड्याच्या वाद्यांमध्ये मुख्य मंदीरला प्रदक्षिणा घालत रंगमहाल बालद्वारी येथे आणण्यात आल्या. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, प्रसाद खाडे, यांच्या मंत्रपठणाने करवीरपिठाचे आध्य शंकराचार्य (विद्यानृसिंह भारती) व सह धमार्दाय आयुक्त शिवाजी कचरे यांचे हस्ते विधिवत धार्मिक विधी करीत घटस्थापना करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, कृष्णा कुदळे, अनिल बारभाई, हरिभाऊ लांघी, हनुमंत लांघी, बापू सातभाई, प्रशांत सातभाई, रमेश राऊत, रवी बारभाई, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त वसंत नाझीरकर, विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, आदींसह समस्त पुजारी-सेवेकरी,खांदेकरी-मानकरी, देवसंस्थान कर्मचारी अधिकारी, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने राज्यातून आलेले भाविक उपस्थित होत.

कार्यक्रमाचे आयोजन जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान, पुजारी-सेवेकरी, खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळ,  मार्तंड देवसंस्थान विश्वस्त यांच्या वतीने करण्यात येत आहे. पुढील सहा दिवस दुपारी १२ ते ५ या वेळेत महाप्रसाद अन्नदानासह गडकोट आवारात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य मंदिर गाभाºयाची विविध आकर्षक फुलांनी सजावट करण्यात येणार आहे. मुख्य मंदिरांसह गडकोटाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिक