लैंगिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2015 02:13 IST2015-06-15T02:13:02+5:302015-06-15T02:13:02+5:30

लैंगिक तसेच अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याची हत्या करून त्याच्या बहिणीला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेमुळे मुंब्य्रात खळबळ उडाली आहे.

Chameleon killing child sex | लैंगिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याची हत्या

लैंगिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याची हत्या

मुंब्रा : लैंगिक तसेच अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याची हत्या करून त्याच्या बहिणीला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेमुळे मुंब्य्रात खळबळ उडाली आहे.
येथील चांदनगर परिसरात राहणाऱ्या घटस्फोटीत महिलेचे याच परिसरात राहणाऱ्या आमीर सय्यद ऊर्फ बिल्ला याच्याशी अनैतिक संबंध आहेत. या संबंधांमध्ये संबंधित महिलेची मुले अडसर ठरत होती. याचा राग
मनात धरून बिल्ला याने सोमवारी (८जून) त्या महिलेच्या रिजवान (४) या मुलाने दूध पिताना ते खाली सांडले़
या क्षुल्लक कारणावरून संतप्त होऊन त्याला तसेच नगमा या तिच्या मुलीला बेदम मारहाण केली. तसेच या मारहाणीची वाच्यता केल्यास तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली.
यात गंभीर जखमी झालेल्या रिजवानचा उपचारादरम्यान मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात शनिवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला, तर नगमा (१२) चा हात जायबंदी झाला आहे.

Web Title: Chameleon killing child sex