शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

स्वतंत्र विदर्भासाठी बुधवारी चक्का जाम, ८० ठिकाणी रास्ता रोको

By admin | Published: January 08, 2017 9:49 PM

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे येत्या ११ जानेवारी रोजी संपूर्ण विदर्भभर ८० पेक्षा जास्त ठिकाणी चक्का जाम रास्ता-रोको आंदोलन होणार आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 8 : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे येत्या ११ जानेवारी रोजी संपूर्ण विदर्भभर ८० पेक्षा जास्त ठिकाणी चक्का जाम रास्ता-रोको आंदोलन होणार आहे. नागपूर शहरातील आंदोलन हे गणेशपेठ बस स्टँडसमोर सकाळी ११ ते ५ या वेळात रास्ता रोको आंदोलन केले जाईल. विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपूर शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी गिरीपेठ येथील पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. श्रीनिवास खांदेवाले हे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शंभरावर प्रमुख कार्यकारिणी सदस्य आवर्जुन उपस्थित होते. समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले की, आजवर आम्ही शआंततेने आंदोलन केले. परंतु आता शांततेचे आंदोलन पुरे झाले. येत्या ११ जानेवारीला विदर्भभर चक्का जाम केला जाईल. यादिवशी सर्व पक्षाच्या सर्व विदर्भाच्या संघटनांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शहर अध्यक्ष दिलीप नरवडीया यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अरविंद देशमुख, अरुण केदार, प्रभाकर कोहळे, मुन्ना महाजन, भरत बाविसटाले,वसंतराव कांबळे, नागदबडी हिरवकर, भैरुयालाल माकडे, भगवानदास राठी, राजू रहाटे, बाबुराव गेडाम, बंडू पाटील कुहीटे, बाबा राठोड, मंगेश मेश्राम, रंगराव हजारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.- जिल्ह्यात या ठिकाणी होणार आंदोलननागपूर जिल्ह्यात कळमेश्वर, काटोल, नरखेड, सिंदी (उमरी), सोनोली,पाटणसावंगी, बुटीबोरी, मौदा (हायवे), कामठी, कन्हान, भिवापूर, उमरेड,रामटेक, कुही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.