शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

सीईटीचा निकाल जाहीर; पर्सेंटाईलमुळे नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 2:27 AM

यंदा प्रथमच सीईटी वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आली. त्यामुळे पर्सेंटाईलचे सूत्र वापरून निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक दिवशीची काठीण्य पातळी पाहून हे पर्सेंटाईल काढण्यात आले आहेत.

मुंबई : एमएटी- सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदाच्या निकालात सुमारे २ हजार ८०० विद्यार्थी ९९.५ पर्सेंटाईलच्यावर असल्याने शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कम्प्युटर सायन्स, मॅकेनिकल आणि आयटी शाखांमध्ये प्रवेशासाठी चुरस पहावयास मिळणार आहे. सीईटीचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला असला, तरी अद्याप संबंधित शाखांच्या संचलनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक अंतिम नियमावली सीईटी सेलकडे आलेली नाही. त्यामुळे अंतिम प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक नियमावली आल्यानंतर लगेचच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यंदा प्रथमच सीईटी वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आली. त्यामुळे पर्सेंटाईलचे सूत्र वापरून निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक दिवशीची काठीण्य पातळी पाहून हे पर्सेंटाईल काढण्यात आले आहेत. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत संभ्रम आहे. जर एखाद्या दिवशी हुशार विद्यार्थी परीक्षेस बसले असतील, तर चांगले गुण मिळवूनही एखाद्या विद्यार्थ्याला कमी पर्सेंटाईल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

त्यामुळे एकाच दिवशी ऑफलाइन परीक्षा घ्यावी, अशी सूचनाही केली जात आहे. मात्र जेईईच्या सूत्रांचा वापर करून हे पर्सेन्टाइल तयार करण्यात आल्याची माहिती सीईटी सेलचे अध्यक्ष आनंद रायते यांनी स्पष्ट केले.एकूण विद्यार्थीउमेदवारांची नोंदणी - ४१३२८४परीक्षेला बसलेले उमेदवार- ३९२३५४परीक्षेस न बसलेले उमेदवार- २०९३०उपस्थितांची आकडेवारी- ९४.९४%अनुपस्थितांची आकडेवारी- ५.०६%नीटच्या निकालाची प्रतीक्षासीईटीतील यशामुळे कुटुंबातील सर्वजण आनंदी आहे, परंतु मी नीटच्या निकालाची प्रतीक्षा करीत आहे. वैद्यकीय शाखेची एमबीबीएसची पदवी मिळविण्याची माझी इच्छा असून, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. सीईटी केवळ सरावासाठी दिली होती. त्यातही राज्यस्तरावर यश मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. हे यश आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच प्राप्त झाले. - अभिषेक घोलप, नाशिक (एससी प्रवर्गातून मुलांमध्ये प्रथम).

शेतकऱ्याची मुलगी असल्याचा अभिमानदोन वर्षांच्या कालावधीत दिवसातून सरासरी ६ ते ७ तास अभ्यास केला. उर्वरित वेळेत क्लास लावले होते. नियमित सराव केल्यामुळे हे यश मिळविले. आता नीट परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. आई-वडिलांसह भाऊ, बहिणी आणि भाऊजींनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील आष्टीसारख्या भागातील एका शेतकºयाची मुलगी राज्यात प्रथम येऊ शकली. याचा मला खूप अभिमान वाटतो. - गीतांजली वारंगुळे, बीड (राखीव संवर्गातून आणि राज्यातून मुलींमध्ये प्रथम).

नागरी सेवेत जाणारवर्षभर दररोज सहा ते सात तास अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्यानेच अपेक्षित यश मिळाले. अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर नागरी सेवेत करिअर करण्याची इच्छा मला आहे. - अमन पाटील, धुळे (खुल्या गटातून पीसीएम संवर्गात मुलांमध्ये प्रथम).आनंदाने भारावलोयबोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने उत्साह दुणावला. त्यामुळे या परीक्षेचाही व्यवस्थित अभ्यास करायचे ठरविले. त्यानुसार, प्रत्येक विषयाला ठरावीक दिवस, तास द्यायचे, अभ्यासाचे नियोजन केले. या परीक्षेत यश मिळेल, अशी आशा होती. मात्र, टॉपलिस्टमध्ये नाव येईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे आनंदाने भारावून गेलो आहे. भविष्यात कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात करियर करायची इच्छा आहे. - हृदयेश परब, निर्मला मेमोरियल फाउंडेशन कॉलेज ऑफ सायन्स, कांदिवली.

अपेक्षित आनंदाने समाधानबोर्डाच्या परीक्षेत अत्यंत नियोजनबद्ध आणि ध्येय ठरवून अभ्यास केला होता. त्याप्रमाणे, प्रवेश परीक्षेसाठीही त्याच चिकाटीने मेहनत घ्यायची, असे ठरविले होते. यासाठी आईबाबांनी चांगला पाठिंबा दिला. दिवसातून १३ तास अभ्यास केला. शिवाय संगीताची आवड या काळात जोपासली. निकाल लागल्यानंतर हे यश अपेक्षित होते. त्यामुळे खूप समाधानाची भावना आहे. भविष्यात इंजिनीअरिंग क्षेत्रात करिअर करून, या क्षेत्राला वेगळे आयाम मिळवून द्यायचे आहे. - ध्रुवी दोशी, प्रकाश कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, कांदिवली.

रात्रंदिवस अभ्यास केलावैद्यकीयसेवा क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत खूप मेहनत घेतली होती. त्याचप्रमाणे, सीईटी, वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठीही खूप मेहनत आणि कष्टाची तयारी ठेवली होती. रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि वेळ मिळेल, तेव्हा प्रवास करायचा असा दिनक्रम होता. त्यामुळे अभ्यास आणि आवडीचा समतोल राखता आला. आता भविष्यात वैद्यकीय व आरोग्यसेवा क्षेत्रात मोठे काम करायचे आहे. - ऋषभ गोसर, प्रकाश कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, कांदिवली.

डॉक्टर होण्याचे स्वप्नआधी बोर्डाची परीक्षा, त्यानंतर नीट दिल्यानंतर, मग सीईटी परीक्षाही देण्याचा विचार केला. विषय आणि वेळेचे नियोजन करून अभ्यास केला. घरच्यांनीही कायम प्रोत्साहन दिले. उत्तम गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आलेला निकाल हा अनपेक्षित आहे. खूप आनंद झाला आहे, भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. - नाविका जटार, के.सी. महाविद्यालय, चर्चगेट. सीईटीत मराठवाड्याची बाजी

टायपिस्टचा मुलगा राज्यात प्रथमपंढरपूर न्यायालयाच्या परिसरात टायपिस्टचे काम करणाºया पालकाचा मुलगा विनायक मुकुंद गोडबोले हा राज्यात पहिला आला आहे. टायपिस्टचे काम करणाºया आई-वडिलांना काम करत असतानाच निकालाची माहिती मिळाली. त्यानंतर न्यायालयात वकिलांना पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला. तो पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

सीईटी परीक्षेत खुल्या गटात मुलींमध्ये मी प्रथम आल्याचे कळले आणि खरोखरच माझा विश्वासच बसला नाही. मला शिक्षक व्हायचं आहे. वेगळ्या वाटेची आपल्याला माहिती व्हावी, यासाठीच मी केवळ सीईटी दिली होती. - मुग्धा पोखरणकर, रत्नागिरी

दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला़ मी जेईईची परीक्षा दिली असून भविष्यात मला आयआयटी करायचे आहे़ - मुकुंदा अभंगे, किनवट, जि़. नांदेड

अभ्यासक्रमातील पुस्तकांचाच वापर अभ्यास करताना करणे आवश्यक आहे़ प्रत्येक विषय समजून घेवून त्याचा अभ्यास केला़ डॉक्टर होण्याची इच्छा आहे़ - ऋचा पालकृतवार, धर्माबाद, नांदेड

टॅग्स :examपरीक्षा