शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूगडावर लेणी सापडल्या

By admin | Updated: June 15, 2015 02:07 IST

माणगाव तालुक्यातील कुर्डूगडावर पुरातन लेणीत १०व्या ते १३व्या शतकातील वास्तूंचा शोध महाड येथील इतिहास संशोधक मंडळाचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रा. अंजय धनावडे

अलिबाग : माणगाव तालुक्यातील कुर्डूगडावर पुरातन लेणीत १०व्या ते १३व्या शतकातील वास्तूंचा शोध महाड येथील इतिहास संशोधक मंडळाचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रा. अंजय धनावडे व महाड येथील सह्याद्री मित्र या गिर्यारोहक संस्थेच्या एका मोहिमेत लागला. प्राथमिक पाहणीनुसार त्यांचा कालावधी हा शिलाहारकालीन असावा, असा त्यांचा निष्कर्ष आहे. या निष्कर्षाला ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी पुष्टी दिली आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील रायगड व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील देवघाट लिंग्या घाट पसिरातील काळ नदीच्या उगमावर असलेल्या कुर्डूगडावर म्हणजेच विश्रामगडावर या झालेल्या संशोधनात या लेणींमध्ये वास्तूंचा पहिला भाग अंदाजे २६ फूट लांब व सहा फूट रुंद असून, त्यात फेब्रुवारी-मार्चपर्यंत पाणी असते. दुसऱ्या भागात इंग्रजी ‘एल’ आकाराचे दालन असून ते पाण्याने भरलेले आहे. सुमारे २३ फूट लांब व १० फूट रु ंद आहे व ३.५ फूट खोल आहे. याला भग्नावस्थेतील कातळ कोरीव प्रवेशद्वार आहे. आतमध्ये कातळात खोदलेल्या खोबण्या आहेत. लाकडी फे्रमवर्कसाठी यांचा वापर झाल्याची शक्यता आहे. याच्यापुढे कड्याला चिकटून थोडे उजवीकडे गेल्यानंतर आणखी एक वास्तू असून, ती सुमारे ६.५ फूट लांब व पाच फूट रुंद आहे. त्याच्या खाली ‘खांब टाक’ आहे. ते साधारण १४ फूट लांब़ त्यात दोन खांब आहेत. या टाक्यांच्या पुढे एक कोरडं टाकं आहे. ते १४ फूट लांब १० फूट रुंद व सात फूट खोल असून यात गाळ आहे. इतिहास संशोधक अंजय धनावडे यांनी गिर्यारोहक डॉ. राहुल वारंगे, अ‍ॅड. प्रशांत भुतकर, समृद्धी भुतकर, रूपेश वनारसे, चिंतन वैष्णव, भूषण शेठ, अमित गुरव, ओंकार माने यांच्या व स्थानिक ग्रामस्थ सांबरे, प्राथमिक शिक्षक ठिगळे यांच्या सहकार्याने या वास्तूंचा शोध घेतला. एक खांब टाके, निवासासाठी असणारी दोन लेणी आणि एक कोरडं टाकं अशा चार वास्तूंचा यामध्ये समावेश आहे. याच परिसरात लिंग्या घाटजवळ असलेल्या डोंगरमाथ्यावर चवऱ्या येथे चौकोनी आकाराच्या मुख असलेल्या पाण्याच्या टाक्या बाराव्या शतकातील असल्याचे धनावडे यांनी सांगितले. या मोहिमेची सुरुवात मे महिन्यात १७ तारखेला करण्यात आली होती.