शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; द्राक्षबागा, ज्वारी, हरभरा आडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 4:36 AM

Rains : सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर/औरंगाबाद :  बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांना फटका बसला. सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मराठवाड्यात नुकसानमराठवाड्यातील काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात देवठाणा, कांदेवाडीसह इतर गावांमध्ये बुधवारी मध्यरात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या परिसरातील संपूर्ण शेती पांढरीशुभ्र झाली. सर्वत्र गारांचे खच साचले होते. 

विदर्भाला तडाखाविदर्भातही पावसाने तडाखा दिला. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली.  हरभरा, गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिकला अवकाळीचा फटकानाशिक जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळसह नवापूर तालुक्यात गारपीट झाली. 

आजही पावसाची शक्यता शुक्रवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

कुलू-मनाली नव्हे, चिखलदरामेळघाटातील खंडूखेडा परिसरात झालेल्या गारपिटीने सिमला, कुलू-मनालीची आठवण झाली. चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागासह चुनखडी, घाना, भुतरुम, बिच्छूखेडा परिसरात गुरुवारी दुपारनंतर गारपीट झाली. 

वीज पडून चौघांचा मृत्यूनागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील पेंढराबोडी आणि कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे वीज पडून सचिन रामाजी सहारे (३५) व अमोल नारायण काखे (२५) यांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात आनंदराव श्यामराव चव्हाण (रा. चिंचखेड, ता. किनवट), माधव दिगंबर वाघमारे (रा. मौजे सुजलेगाव, ता. नायगाव) यांचा वीज पडून मृत्यू झाला.  

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र