शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही क्षणी गुन्हे दाखल होणार

By admin | Updated: July 16, 2015 00:00 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्याची पूर्ण तयारी सरकारने केली असून, ही कारवाई आता कोणत्याही

- यदु जोशी,  मुंबई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्याची पूर्ण तयारी सरकारने केली असून, ही कारवाई आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. या घोटाळ्याची पाळेमुळे ‘लोकमत’ने खणून काढली होती. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे या महामंडळाचे अध्यक्ष असताना कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले गेले. या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी झाल्यानंतर घोटाळ्याची रक्कम ४०० कोटींहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी सांगितले की सीआयडीचे महासंचालक उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशी अहवाल सादर करणार आहेत. उद्या किंवा सोमवारी विधानसभेत याबाबत कारवाईची घोषणा सरकारकडून केली जाईल. मनमानी कर्जवाटप, नियमबाह्य कर्मचारी भरती, नियमबाह्य खरेदी, कदम अध्यक्ष असलेल्या संस्थांना १४२ कोटी रुपये देणे, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात १९० कोटी रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप, जमीन खरेदी घोटाळा आदी अनेक प्रकरणांत हे महामंडळ खरडून खाण्यात आले. ‘लवकरच कारवाई’विधानसभेत आज भाजपाचे डॉ. संजय कुटे यांनी या महामंडळातील घोटाळ्यांप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. महामंडळाच्या तिजोरीवर डल्ला मारणारे घोटाळेबाज अद्याप मोकाट का आहेत, असा सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात खाल्लेल्या पैशांची वसुुली केली तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे सहज शक्य होईल, असा टोला त्यांनी हाणला. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी एकाही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. गोरगरिबांसाठी असलेल्या या महामंडळात घोटाळे करणाऱ्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. अधिवेशन संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.