मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 16, 2014 02:16 IST2014-09-16T02:16:53+5:302014-09-16T02:16:53+5:30

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणो शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह 1क् ते 15 कार्यकत्र्यावर नौपाडा पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आह़े

A case has been registered against Jitendra Awhad | मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

ठाणो : एका खासगी वृत्तवाहिनीच्या टॉक शोदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमच्या कार्यकत्र्यामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या असून यात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणो शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह 1क् ते 15 कार्यकत्र्यावर नौपाडा पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आह़े दुसरीकडे एमआयएमच्या मुलाणींवरही  गुन्हा करण्यात आला आह़े
मुंब्य्रातील माजी नगरसेवक अश्रफ मुलाणी यांना झालेली मारहाण थांबल्यानंतर पुन्हा मारहाण करण्यासाठी कार्यकत्र्याना चिथावणी दिल्याचा ठपका आव्हाडांवर ठेवण्यात आला आहे. मुलाणी यांच्यावरही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव समीर शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या मारहाणीत मुलाणी आणि त्यांचा मुलगा जुनेद हे दोघे जखमी झाले आहेत.
शनिवारी तलावपाळी परिसरात हा टॉक शो आयोजित केला होता. या वेळी विकासकामांच्या मुद्दय़ावरून मुलाणी आणि आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रधान यांनी मुलाणी यांना मारहाण केली. तसेच मारहाण थांबल्यावर आव्हाड यांनी कार्यकत्र्याना त्यांना मारहाण करण्यास चिथावणी केल्याची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. पुन्हा मारहाण होत असताना ती सोडवण्यासाठी आलेला मुलगा जुनेद आणि मित्र ताहा हुसेन यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

Web Title: A case has been registered against Jitendra Awhad