शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Maharashtra New Governor: मोदी सांगतील तिथे...! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कॅप्टन अमरिंदर सिंग? काय म्हणाले पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 9:43 PM

Maharashtra Politics: शिवाजी महाराज वक्तव्य प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती.

महाराष्ट्रातील वादात सापडलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त व्हायचे असल्याचे कळविले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून ते वादात सापडले होते. त्यांना हटविण्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यात ठिकठिकाणी बंद पाळला होता. अगदी उदयनराजे, संभाजीराजे यांनी देखील मोहिम सुरु केली होती. असे असताना प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती. परंतू, त्यालाही बरेच दिवस झाले आहेत. केंद्रातून काही हालचाली दिसत नाहीएत. अशातच राज्याचे नवे राज्यपाल कोण असतील यावरून नावांची चर्चा सुरु झाली आहे. 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील असे बोलले जात आहे. असे असताना अमरिंदर सिंग यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

s

महाराष्ट्राचे राज्यपाल बनण्याच्या सर्व शक्यतांवर सिंग यांनी त्या अफवा आहेत असे सांगितले. मला याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत माझ्याशी कोणीही बोलले नाही. हे पूर्णपणे काल्पनिक आहे. मी मोदींना जेव्हा भेटलेलो तेव्हा त्यांना मी तुमच्यासोबत असल्याचे म्हणालो होतो. ते जिथे सांगतील तिथे मी जाण्यास तयार आहे, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा