शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

पर्यटनाची राजधानी नावालाच; औरंगाबादची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 3:49 AM

पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबत खूप मागे

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी २७ मार्च २०१५ रोजी औरंगाबादलापर्यटन राजधानीचा दर्जा देऊन पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले खरे, मात्र आजही हे शहर पायाभूत सुविधा, पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबतची वानवा यांच्याशी झुंज देत असून, पर्यटकांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे पर्यटन राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता औरंगाबाद एक परिपूर्ण पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.औरंगाबादमध्ये पर्यटकांच्या सुविधांची वानवा जाणवत असून, बहुसंख्य पर्यटक येथे राहणे पसंत करीत नाहीत. जोपर्यंत पर्यटक येथे रमणार नाहीत तोपर्यंत पर्यटनावर आधारित इतर उद्योग येथे बहरणार नाहीत. म्हणूनच केवळ पर्यटन राजधानी म्हणून विकास करण्यापेक्षा पर्यटन केंद्र म्हणून शहर आकर्षक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औरंगाबादचा औद्योगिक विकास होण्यासाठी शहरात एमआयडीसी, डीएमआयसी यासारखी औद्योगिक क्षेत्रे उभी राहिली. याच धर्तीवर पर्यटन केंद्र किंवा राजधानी म्हणून शहराचा विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.देश-विदेशातील पर्यटकांना अजिंठा-वेरूळ लेण्यांसह शहरातील ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळांचे देखील आकर्षण आहे; परंतु या वास्तू किंवा स्थळांची पुरेशी माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. यामुळे बहुतांश पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी आणि मकबरा पाहून निघून जातात. आता तर मनपातर्फे रेल्वेस्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्रालाही कायमचे टाळे लागले आहे, तसेच एमटीडीसीचे अधिकृत संकेतस्थळही विविध बदलांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात कुचकामी ठरते.सुविधांची वानवाशहरात उत्तम दर्जाचे बाग-बगीचे, पर्यटकांच्या दृष्टीने निर्माण झालेली बाजारपेठ, बालकांसाठी करमणुकीची ठिकाणे, कला दालने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियमित होणारे आयोजन, शहरातील पर्यटन स्थळांना एका शृंखलेत जोडणारी बसव्यवस्था, तसेच दिवसभर पर्यटन करून परतल्यावर वेळ घालविण्यासाठी एखादे रम्य ठिकाण या सुविधा कोणत्याही पर्यटकांना हव्या असतात. त्यामुळे या सुविधा तर शहरात निर्माण कराव्यातच; पण यासोबतच या सर्व सोयीसुविधांची बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये योग्य प्रमाणात प्रसिद्धी होऊन तेथील पर्यटक कसे शहरात येतील, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन