शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघाला गोळ्या घालून मारले

By admin | Updated: December 29, 2014 00:29 IST

कोंगळा जंगलात कारवाई : वन खात्याची मोहीम फत्ते

बेळगाव : एक महिन्याहून अधिक काळ धुमाकूळ घालून महिलेचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघाला आज, रविवारी रात्री आठच्या सुमारास वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले. नेरसाजवळील कोंगळा जंगलात या वाघाला ठार केल्याची माहिती डी.एफ.ओ. अंबाडी माधव यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून वन खात्यासह इतर खात्यांचे ३०० हून अधिक कर्मचारी वाघाचा शोध घेण्याच्या मोहिमेत गुंतले होते. काल, शनिवारी चामराजनगर येथून आलेले स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सचे जवानही वाघ शोधण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते. दांडेली येथून प्रशिक्षित हत्तीही वाघ शोधण्यासाठी मागविण्यात आला होता . मुडगई येथील अंजना हणबर या महिलेवर वाघाने ठार केल्यानंतर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी वन खाते आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर वाघ पकडण्याच्या मोहिमेला गती प्राप्त झाली. प्रधान मुख्य वनसंरक्षक विनय लुथ्रा यांनी वाघाला गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश दिल्यावर इतर ठिकाणांहून फौजफाटा मागवून वाघ पकडण्याच्या मोहिमेला जोमाने प्रारंभ करण्यात आला. गेले दोन दिवस वाघ आणि वन खात्याचे कर्मचारी यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरू होता. वाघ आलाय, अशी माहिती मिळताच वन खात्याचे कर्मचारी संबंधितस्थळी जात होते. मात्र, तोपर्यंत वाघाने तेथून मुक्काम हलवलेला असायचा. अखेर आज वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नरभक्षक वाघाला गोळ्या घालून ठार केले.