उमेदवार भाजपचा, प्रचार राष्ट्रवादीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 01:04 IST2019-10-13T01:04:31+5:302019-10-13T01:04:52+5:30

उमेदवार भाजपचा, पण फेसबुकवरील विविध अकाउंट आणि पेजेसवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो, भाजप विरोधातील अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करणाऱ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

The candidate is BJP, campaigning for NCP | उमेदवार भाजपचा, प्रचार राष्ट्रवादीचा

उमेदवार भाजपचा, प्रचार राष्ट्रवादीचा

मुंबई : उमेदवार भाजपचा, पण फेसबुकवरील विविध अकाउंट आणि पेजेसवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो, भाजप विरोधातील अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करणाऱ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुलाब्यातील भाजप उमेदवार राहुल नार्वेकर उमेदवारी जाहीर होईपर्यंत राष्ट्रवादीत होते. आता ते भाजपमध्ये असले, तरी त्यांचे फेसबुक अकाउंट, पेजेस अजून राष्ट्रवादीच्या घड्याळातच अडकले आहेत.


नार्वेकर यांच्या पेजवर भाजपवर निशाणा साधणाºया पोस्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आदी तसेच आहेत. नाही म्हणायला काही भाजप पदाधिकारी आपापल्या पेज, अकाउंटवर त्यांच्या प्रचाराचे फोटो टाकत आहेत़ नार्वेकर यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी फेसबुक, टिष्ट्वटरसह समाजमाध्यमांतून आक्रमक प्रचार चालविला आहे.


विविध सामाजिक कामातील सहभाग, आजवर घेतलेले कार्यक्रम आदींची माहिती देणारे छोट्या छोट्या चित्रफिती शेअर केल्या जात आहेत, तर प्रचारातील रोजचे फोटो घडामोडीही सोशल मीडियातून शेअर होत आहेत.


मुंबादेवीतील काँग्रेस उमेदवार अमिन पटेल आणि शिवसेना उमेदवार पांडुरंग सकपाळ या उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रचारसभांची माहिती, प्रचारातील ठळक फोटो टाकण्याचा सपाटा लावला आहे. याशिवाय, पटेल यांनी आमदारकीच्या काळातील लाभार्थ्यांचे व्हिडीओसुद्धा टाकले आहेत.
मलबार हिलमधील भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा यांच्या डिजिटल प्रचारात आजवर त्यांनी केलेल्या कामांचे फोटो, चित्रफिती आहेत.

Web Title: The candidate is BJP, campaigning for NCP