शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

व्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणे शक्य!

By admin | Updated: November 3, 2014 04:31 IST

व्यंग अर्भकाचे पोषण करणे हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दिव्य ठरते. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचे कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही.

मुंबई : व्यंग अर्भकाचे पोषण करणे हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दिव्य ठरते. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचे कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याची संमती आहे. पण ही मर्यादा आता तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळाने बनवला आहे. देशभरातील अनेक कुटुंबांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. व्यंग अर्भक जन्माला येण्याचे प्रमाण जगात ३ टक्के आहे. आपल्याकडे हे प्रमाण कमी आहे. व्यंगासह जन्माला येणाऱ्या अर्भकाला आयुष्यभर होणारा त्रास हा त्या कुटुंबासह सामाजिकदृृष्ट्यादेखील चिंतेचाच विषय असतो. यावर तोडगा म्हणजे गर्भातील अर्भकाची शारीरिक रचना जाणून घेतल्यानंतर ते कुटुंब पुढील निर्णय घेऊ शकते. त्यातही एखाद्या कुटुंबाने गर्भपाताचा निर्णय घेतल्यास त्याला कायद्याने घालून दिलेली २० आठवड्यांची मुदत आडवी येते. त्यामुळे त्या कुटुंबाला गर्भपात करता येत नाही. पर्यायाने व्यंग अर्भक जन्माला येण्याची शक्यता बळावते. पुढे त्या अर्भकासह त्याच्या कुटुंबालाही समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत २० आठवड्यांची मर्यादा वाढवणे आवश्यकच होते. केंद्राने या कायद्यात बदल करण्याचे प्रस्तावित केले असून, मर्यादा २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. सध्या १९७१च्या गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार, व्यंग किंवा जिवाला धोका असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी २० आठवड्यांपर्यंतची मुदत आहे. मात्र २० आठवड्यांपर्यंत गर्भाची वाढ परिपूर्ण झालेली नसते. २० आठवड्यांपर्यंत गर्भाचे हृदय, मेंदू या अवयवांची वाढ ही प्राथमिक स्वरूपाची झालेली असते. २० आठवड्यांपासून २४ आठवड्यांपर्यंत गर्भाची जी वाढ होते, त्यात प्रामुख्याने हृदय आणि मेंदूमध्ये व्यंग असल्यास त्याचे निदान करता येते. या काळात गर्भाचा आकार वाढतो, त्यामुळेही त्याच्या तपासण्या करून व्यंग शोधण्यास सोपे जाते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यामुळेच गर्भपाताची मुदत २० आठवड्यांऐवजी २४ आठवडे केल्यास त्याचा फायदा होणार असल्यामुळे डॉक्टरांकडून या बदलाचे स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)