एक व्हिडीओ कॉल आणि त्याने संपवले आपले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 16:41 IST2017-08-29T16:27:42+5:302017-08-29T16:41:59+5:30
कानाला हेड फोन, मोबाईलवर व्हिडीओ कॉल चालू आणि बघता बघता त्याने आपली जीवनयात्रा संपवली. घटना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक-1मधील.

एक व्हिडीओ कॉल आणि त्याने संपवले आपले जीवन
औरंगाबाद, दि. 29 : कानाला हेड फोन, मोबाईलवर व्हिडीओ कॉल चालू आणि बघता बघता त्याने आपली जीवनयात्रा संपवली. घटना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक-1मधील.
परभणी जिल्ह्यातील परतूर येथील अमोल काकडे हा विद्यार्थी वसतिगृह क्रमांक- 1 मध्ये रूम नंबर 76 मध्ये वास्तव्यास होता. तो कालच गावावरून आला होता. आज दुपारी तो रूमवर आला असता कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. यानंतर कोणाच्या काही लक्षात येण्याआधीच अचानक त्याने रूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या कानाला हेडफोन लावलेले होते व त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल सुरु होता. इतिहास विभागातील त्याच्या वर्गमित्रानुसार तो अत्यंत सुस्वभावी मुलगा होता. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण विद्यापीठ हादरून गेले आहे.
अमोलचा मृतदेह पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे नेण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून पुढील तपास सुरु केला आहे.