केबल चालकांचा गुरुवारी सायंकाळी राज्यभर 'ब्लॅकआऊट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 12:21 IST2018-12-26T12:20:40+5:302018-12-26T12:21:14+5:30
वाहिनीनुसार पैसे घेण्याचा निर्णय ट्रायने जाहीर केल्याविरोधात राज्यातील केबल व्यावसायिकांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

केबल चालकांचा गुरुवारी सायंकाळी राज्यभर 'ब्लॅकआऊट'
मुंबई : वाहिनीनुसार पैसे घेण्याचा निर्णय ट्रायने जाहीर केल्याविरोधात राज्यातील केबल व्यावसायिकांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्य़े या निर्णयाविरोधात गुरुवारी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राज्यातील केबल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिल परब यांनी दिली आहे.
तसेच स्टार कंपनीवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार असून या कंपनीचे बुके (चॅनलचे पॅकेज) घेणार नसून, त्यावर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केबल ऑपरेटर अँन्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनने आजच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी सायंकाळी महत्वाच्या वेळेमध्येच केबल बंद राहणार असल्याने राज्यभरातील दर्शकांना त्रास सहन करावा लागणार आहे.