शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

गणेश विसर्जन वादावरून मंत्रिमंडळात अधिकाऱ्यांवर आगपाखड; भोंग्याबाबत पालन का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 05:57 IST

पीओपी बंदीविराेधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार, गणेशमूर्ती विसर्जनात अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी

मुंबई - प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वादाचे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. पीओपी मूर्ती विसर्जनावर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत पोओपी मूर्तींच्या विसर्जनाला आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत बैठकीत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रशासन भोंग्याबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करत नाही, असा प्रश्न करत काही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला.माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनास प्रशासनाने ऐनवेळी मनाई केली. त्यामुळे अनेक मंडळांनी मूर्ती विसर्जन न करताच परत नेल्या. 

अधिकाऱ्यांवर आगपाखडमंत्रिमंडळाच्या बैठकीतील नियोजित विषयांवरील चर्चेनंतर सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना बाहेर काढत माघी गणेशोत्सवाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मंत्री आशिष शेलार यांनी गणेश विसर्जनाचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांवर आगपाखड केल्याचे समजते. माघी गणेशोत्सवासंदर्भात नियम पाळण्यावरून आडमुठी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत शेलारांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली. या अधिकाऱ्यांकडून हिंदूविरोधी भूमिका घेतली जात असल्याची तक्रार शेलारांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गणेशमूर्तीबाबत न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांची तत्परता जेव्हा न्यायालय भोंगे उतरवण्याचे आदेश देते तेव्हा कुठे जाते, असा प्रश्न शेलारांनी उपस्थित केल्याचे समजते. शेलार यांनी हा मुद्दा मांडताच अन्य मंत्र्यांनी विशेषतः शिंदे गटाच्या मंत्र्यांनीही आवाज उठविला.

निकालाला आव्हान देण्याची भूमिकापीओपी मूर्तींच्या विसर्जनास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे निकालाचा सविस्तर अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत मांडली. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विसर्जन करू न देणाऱ्यांचे कसले हिंदुत्व, अशी टीका करत या मुद्द्यावर भाजप आणि शिंदेसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलार