शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र खुला; सेनेचं प्राधान्य मुंबईलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 11:17 IST

Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेकडून मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदासह सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील ठाण्याचे आहेत.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. काँग्रेसने आपली यादी जाहीर केली असून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे देखील समोर आली आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि देण्यात आलेली मंत्रीपदे यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रात संघटन वाढविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी आहे. 

महाविकास आघाडीत मुंख्यमंत्रीपद मुंबईच्या वाट्याला गेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. तर पहिल्या रांगेत मंत्रीपदाची शपथ घेणारे सुभाष देसाई मुंबईचेच आहेत. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून मुंबईकडील नेत्यांचाच अधिक वावर असणार आहे. 

मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने आपली वाटचाल सुरू केली आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी राज्यात पक्षविस्तार करण्यासाठी दार खुली झाली आहे. याआधी शरद पवार यांनीच स्पष्ट केले होते की, पक्षाचा विस्तार करण्यासाठीच आपण मुख्यमंत्रीपद घेत नाहीत. आता देखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद न घेता अधिकची मंत्रीपदे घेतली आहे. ज्याचा फायदा त्यांना राज्यात पक्षाचा विस्तार कऱण्यासाठी होणार आहे. 

शिवसेनेकडून मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदासह सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर यांचे मंत्रीपद निश्चित आहे. तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील ठाण्याचे आहेत. एकूणच शिवसेनेने मुंबईवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुंबईतून वर्षा गायकवाड, अस्लम शेख तर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांच्या रुपाने मंत्रीपदे दिली आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे