शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २३ वर्षे द्यावा लागणार सी-लिंकचा टोल

By admin | Updated: March 23, 2015 02:11 IST

वांद्रे-वरळी सी-लिंकच्या टोलदरात वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) घेण्यात आला आहे.

मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकच्या टोलदरात वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) घेण्यात आला आहे. एकेरी प्रवासासाठी पाच रुपये वाढ करण्यात येणार असून, मासिक पासमध्ये २५0 रुपये वाढ करण्यात येणार आहे. मुळात ३0 वर्षे टोल भरण्याचा करार असून, यातील सात वर्षेच टोलवसुलीची झालेली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना यापुढे टोलवाढीचा फटका बसत राहणार आहे. सी-लिंकच्या प्रकल्पाची किंमत ही सुरुवातीला १,६३४ कोटी रुपये होती आणि त्यानंतर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच्या किमतीत वाढ झाली. जोपर्यंत प्रकल्पाची किंमत वसूल होत नाही, तोपर्यंत टोलवसुली सुरूच राहणार आहे. यासाठी ३0 वर्षे टोलवसुलीचा करार एमएसआरडीसीचा झालेला आहे. २00९ सालापासून दर तीन वर्षांनी सी-लिंकच्या टोलदरात वाढ केली जात असून, आतापर्यंत तीन वेळा टोलवसुली झालेली आहे. ३0 वर्षांपैकी फक्त सात वर्षेच टोलवसुली झाल्याने आणखी २३ वर्षे टोलवसुलीचा भार सोसावा लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून सी-लिंकच्या टोलदरात वाढ होत असून, एकेरी प्रवासासाठी ५ रुपयांची वाढ आहे. त्यामुळे ५५ रुपयावरून टोल ६0 रुपये होईल. तर दुहेरी प्रवासासाठी ८२.५0 रुपयांवरून ९0 रुपये होईल, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. मासिक पासच्या दरातही वाढ झाली असून ५0 ट्रिप्ससाठी आता २ हजार ७00 रुपये मोजावे लागतील.30वर्षे टोलवसुलीचा करार असून, तसा अध्यादेशच आहे. सी-लिंकवरील टोलवसुली २00९ पासून होत आहे. आता १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील, असे एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सांगितले. 60येत्या १ एप्रिलपासून सी-लिंकच्या टोलदरात वाढ होत असून, एकेरी प्रवासासाठी ५ रुपयांची वाढ आहे. त्यामुळे ५५ रुपयांवरून टोल ६0 रुपये होईल.