पुणे - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांसह उद्योगपतींनाही बसला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारा गॅस टँकर पलटी झाला आणि तब्बल ३० तासांहून अधिक काळ या हायवेवर वाहतूक ठप्प झाली. जवळपास २० किमी वाहनांच्या रांगा लागल्या. त्यात शेकडो वाहने अडकली. या वाहतूक कोंडीत पिनॅकल ग्रुपचे चेअरमन उद्योगपती डॉ. सुधीर मेहता अडकले होते. जवळपास ८ तास मेहता वाहतूक कोंडीत फसले होते. अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले. त्यानंतर सुरक्षितपणे सुधीर मेहता यांना पुण्यात पोहचवण्यात आले.
डॉ. सुधीर मेहता हे EKA मोबिलिटी आणि पिनॅकल इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. एअरलिफ्टनंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर वाहतूक कोंडीचे फोटो शेअर केले. गॅस टँकर पलटी झाल्याने मुंबई पुणे वाहतूक कोंडी झाली. त्यात हजारो प्रवासी कित्येक तास कोंडीत फसले. यात वृद्धांपासून लहान मुलांचाही समावेश होता. प्रशासनाकडून टँकरमधील गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु त्यांना यश आले नाही. एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे बंबही तिथे पोहचले होते. या वाहतूक कोंडीने प्रवाशांना खूप हाल सहन करावे लागले. त्यात आजारी माणसांची बिकट अवस्था झाली.
उद्योगपतींना हेलिकॉप्टरने केले एअरलिफ्ट
डॉ. सुधीर मेहता यांनी एक्सप्रेस वेवरील आपत्कालीन परिस्थितीवरून चिंता व्यक्त केली. या प्रकारच्या स्थितीतून लोकांची सुटका व्हावी यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. एक्सप्रेस वे वर वेगवेगळ्या ठिकाणांवरून आपत्कालीन एक्झिट देण्यात यायला हवी जेणेकरून गरज भासल्यास वाहनांना त्यामार्गे वळवण्यात येईल अशी मागणी सुधीर मेहता यांनी केली.
आपत्कालीन एक्झिट पाँईंट आणि हेलिपॅड बनवण्याची मागणी
दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी पाहून अनेक प्रश्न ऐरणीवर आलेत. त्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. त्यात एक्सप्रेस वे जवळ अनेक ठिकाणी हेलिपॅड बनवण्याचाही प्रस्ताव समोर आला आहे. हेलिपॅड कमी खर्चात बनवले जाऊ शकतात. त्यासाठी खुल्या जागेचीही जास्त गरज नाही. मुंबई पुणे वाहतूक कोंडीतून एअरलिफ्ट करून सुधीर मेहता यांना त्यातून सोडवण्यात आले. त्यामुळे त्यांनी एविएशन कंसल्टेंट आणि एअर वेटरन नितीन वल्डे यांचे आभार मानले.
कोंडीचा सर्वसामन्यांना मोठा फटका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीचा थेट फटका मुंबई व ठाण्यातील दूध पुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबई, ठाणे परिसरात सुमारे ५० टक्के दूध पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांतून मुंबई, पनवेलमार्गे ठाणे, मुंबईत येणारे सुमारे ५० टक्के दूध वाहतूक करणारे ट्रक आणि टँकर महामार्गावरच अडकल्याने शहरातील दूध वितरण विस्कळीत झाले आहे.
Web Summary : A gas tanker accident caused a massive Mumbai-Pune highway traffic jam. Pinnacle Group's chairman, Dr. Sudhir Mehta, was stuck for 8 hours and had to be airlifted. He urged emergency exits and helipads for such situations, while milk supplies faced disruption.
Web Summary : गैस टैंकर पलटने से मुंबई-पुणे हाईवे पर भारी जाम लग गया। पिनाकल ग्रुप के चेयरमैन डॉ. सुधीर मेहता 8 घंटे तक फंसे रहे और उन्हें एयरलिफ्ट करना पड़ा। उन्होंने आपातकालीन निकास और हेलीपैड की मांग की, दूध की आपूर्ति बाधित।