शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सरकार, सिडकोत दलाल बसलेत; भाजपा आमदार गणेश नाईक यांचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:29 IST

नवी मुंबई महापालिकेला मैदान, उद्याने, शाळा, रुग्णालये आदी नागरी सुविधांसाठी भूखंड मिळू शकलेले नाहीत, ही बाब नाईक यांनी समोर आणली. 

मुंबई - सिडको आणि राज्य सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल बसले आहेत. या दलालांमुळे जनतेच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत तसेच सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत, अशा शब्दांत भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नवी मुंबई महापालिकेला सिडको प्राधिकरण आणि एमआयडीसी भूखंड मिळावेत, अशी मागणी नाईक यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. १९७० च्या दशकात  सिडकोने ५० पैसे चौरस मीटर दराने शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या. १९९२ साली नवी मुंबई  महापालिकेची स्थापना होऊन १९९५ मध्ये पहिली निवडणूक झाली, असे सांगत गेल्या ३० वर्षांत सिडको, एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला मैदान, उद्याने, शाळा, रुग्णालये आदी नागरी सुविधांसाठी भूखंड मिळू शकलेले नाहीत, ही बाब नाईक यांनी समोर आणली. 

१३ महिने उलटूनही कार्यवाही नाहीच! यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी १ जून २०२३ रोजी बैठक घेतली. या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, एमआयडीसीचे अधिकारी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एकत्र बसून प्रश्नांचा निपटारा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. मात्र, १३ महिने उलटूनही पुढे काहीच झाले नाही, अशी टीकाही नाईक यांनी यावेळी केली.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा