नीलेश शहाकार बुलडाणा, दि. ४ - दळणवळण व जनसंपर्कासाठी रस्त्यांसह पुलांचेही महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नदी व मार्गावरील पूलनिर्मिती करताना शासनाकडून गांभीर्याने पाहले जाते. परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रिटिशकालीन पूल असून, त्यापैकी सात पुलांची खस्ता हालत झाली आहे. याकडे तत्काळ जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नकारता येत नाही.नदी-नाल्यांवर निर्माण केलेले पूल मजबूत असणे आवश्यक आहे. बर्याच वेळा पावसाळय़ात ग्रामीण भागात नदीला पूर आल्यामुळे पाण्यासोबत पूल वाहून जातो. यामुळे गावाचा संपर्क तुटतो. गावाच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण भागात बर्याच ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली आहे. शिवाय बरेच पूल १९२६ ते १९३९ या ब्रिटिश काळात बांधण्यात आले आहेत. या पुलांची मजबुती कायम ठेवण्यासाठी पुलांची उंची कमी ठेवण्यात आली आहे.बुलडाणा शहर ब्रिटिशकाळात ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय होते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत जागरुकता दाखत ब्रिटिश अधिकार्यांनी येथील विविध नद्यांवर अनेक पुलांची निर्मिती केली. यापैकी सद्यस्थितीत सात पुलांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. मात्र या पुलांची प्रशासनाकडून नियमित देखभाल होत नसल्यामुळे सर्वच पूल जर्जर झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन या पुलांवरून प्रवास करावा लागतो.दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजिक सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकारची घटना जिल्ह्यात एखाद्या पुलावर भविष्यात होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने सदर पुलांकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.या मार्गावर आहे ब्रिटिशकालीन पूल मार्ग नदी वर्षमलकापूर - जालना (आमना) १९३९मलकापूर - जालना (खडकपूर्णा) १९२६जालना - मेहकर (पैनगंगा) १९२६ नांदुरा - मोताळा (विश्वगंगा) १९३३येरली - ( पूर्णा ) १९२६टिवरोडा ( पूर्णा ) (उपलब्ध नाही )खामगाव - चिखली ( मन) (उपलब्ध नाही )
ब्रिटिशकालीन सात पुलांची खस्ता हालत!
By admin | Updated: August 5, 2016 01:05 IST