शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

फसविणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: August 1, 2014 01:16 IST

दर आठवड्यात पुरस्कार जिंकण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना लाखो रुपयांनी लुबाडणाऱ्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. एफआयआर रद्द करण्याची

गुन्हेगारांनो सावधान : एफआयआर रद्द करण्याची विनंती फेटाळलीनागपूर : दर आठवड्यात पुरस्कार जिंकण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना लाखो रुपयांनी लुबाडणाऱ्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. एफआयआर रद्द करण्याची आरोपींची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे.विजय शर्मा, जय सगने, सुरेंद्र नवरे, मोहम्मद साबीर मोहम्मद हनिफ, मोहम्मद इरफान अब्दुल रज्जाक, अफसर शाह लाल शाह व शंकर गायमुखे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सेवा मार्केटिंग नावाच्या संस्थेमार्फत ११ फेब्रुवारी २०१३ पासून दिग्रस व आजूबाजूच्या शहरांत भाग्यशाली सोडतीची योजना राबविली. दर आठवड्यात भाग्यशाली सोडत काढून चार ग्राहकांना पुरस्कार वितरित करण्याचे प्रलोभन त्यांनी नागरिकांना दिले. योजनेची मुदत १२ आठवड्यांची होती. योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना पहिल्या आठवड्यात ३०० व नंतर प्रत्येक आठवड्यात २०० याप्रमाणे एकूण २५०० रुपये भरायचे होते. सुमारे सहा हजार ग्राहक योजनेचे सदस्य झाले होते. आरोपींनी भाग्यशाली सोडती काढल्या, पण विजयी ग्राहकांना पुरस्कारच वितरित केले नाही. यामुळे शेख कलीम, पी. पी. पप्पुवाले, शेख अमान, मोहम्मद मोबीन व इस्माईल खान शेर खान यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. यावरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ व इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपींनी योजना राबविण्यापूर्वी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी भाग्यशाली सोडतीचे कूपन छापले होते. दोन महिन्यानंतर त्यांचा भंडाफोड झाला. पुरस्कार मिळाले नसल्याने ग्राहकांना आपली आर्थिक पिळवणूक होत असल्याची उपरती झाली. यामुळे त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपींचा कट उघडकीस आणला.एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी व तक्रारकर्त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. आपसी सामंजस्याने वाद मिटविल्यामुळे एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती अर्जदारांनी केली होती.शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडून प्रकरणातील विविध महत्त्वाच्या मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यामुळे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी अर्ज फेटाळून लावला. हे प्रकरण केवळ पाच ग्राहकांशी संबंधित नाही. सुमारे सहा हजार ग्राहकांना आरोपींनी लुबाडले आहे. यामुळे एफआयआर रद्द करण्याची विनंती मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)