शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:41 IST

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics ( Marathi News ) : काल १२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या  वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.  दरम्यान, आता या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. 

“ED, CBI यंत्रणा आमच्या ताब्यात असत्या तर १५ मिनिटांत भाजपा रिकामा केला असता”: संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांचे पाच खासदार फोडा केंद्रात मंत्रिपद मिळवा अशी ऑफर असल्याचा दावा केला आहे.  यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत आणि भाजप सोबत जाणं हे एकच आहे. मी शरद पवार यांना ओळखतो. मी रोजच त्यांच्यासोबत असतो. संसदेत राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे. कुणीतरी फार ठरवून हे जागावाटप केलेलं आहे. धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या महाराष्ट्रात बिंबविण्याचा प्रयत्न केला अशा विचारापासून शरद पवार दूर जातील असं मला वाटत नाही, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.

"या संदर्भात गौतम अदाणी मध्यस्थी करत आहेत. त्यांच्या घरी सध्या राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा ते प्रयत्न करतात . हे गौतम अदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य घडवणार आहेत.  - ते दादा धर्माधिकारी आहेत का? विनोबा भावे आहेत का ?ते यशवंतराव चव्हाण आहेत का ? एक उद्योगपती नरेंद्र मोदींचा मित्र आहे. तो महाराष्ट्रात राजकारण करणार, महाराष्ट्राचा भवितव्य ठरविणार आणि हे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजेत स्वतःला मराठी म्हणून घ्यायला, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

संजय राऊतांचा मोठा दावा 

संजय राऊत म्हणाले, अजित पवार गटाला मंत्रिपद यासाठी नाही की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितलं आहे की, पवार यांचे पाच खासदार फोडून घेवून या तेव्हा सहाचा कोटा पुर्ण होईल.  नंतर मंत्रिपद मिळेल. शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आता ही लोक फोडत आहेत. फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपाAmit Shahअमित शाह