शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

योग्य जीवनशैलीमुळे वाढते ‘ब्रेन पॉवर’

By admin | Updated: July 22, 2014 01:21 IST

मेंदू हे माणसाला पडलेलं सर्वात मोठं कोडं आहे आणि या कोड्याचं उत्तर पुन्हा मेंदूतच दडलं आहे. विशेष म्हणजे आपल्या शरीरातील शेकडो कामे मेंदू बिनबोभाट करीत असतो, परंतु हा अवयव अद्यापही दुर्लक्षित आहे.

सुमेध वाघमारे- नागपूरमेंदू हे माणसाला पडलेलं सर्वात मोठं कोडं आहे आणि या कोड्याचं उत्तर पुन्हा मेंदूतच दडलं आहे. विशेष म्हणजे आपल्या शरीरातील शेकडो कामे मेंदू बिनबोभाट करीत असतो, परंतु हा अवयव अद्यापही दुर्लक्षित आहे. योग्य जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये बदल केला तर स्मरणशक्ती वाढू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चुकीचा आहार शरीरासोबतच मेंदूला संकटात लोटत असतो. एका संशोधनातून असे आढळले की, आहारात कृत्रिम रंग, कृत्रिम चवी आणि प्रिझर्व्हेटिव्ह असलेले पदार्थ जास्त असले तर त्याचा दुष्परिणाम होतो. परंतु शालेय मुलांच्या डब्यापासून शाळांच्या कॅन्टिनपर्यंत अशाच पदार्थांचा ताबा वाढल्याने त्याचे घातक परिणाम दिसूनही येऊ लागले आहे. त्यामुळेच पदार्थ खाण्याआधी त्यातला धोका लक्षात घ्यायला हवा. असे पदार्थ टाळायला हवेत. मेंदूला तरतरीत ठेण्यासाठी योग्य आहार घ्यायला हवा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मेंदूला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते. यामुळे लहानपणापासूनच समतोल आहाराची सवय अंगी बाणल्यास याचा फायदा होतो. सकाळी काही न खातापिता बाहेर पडल्याने रक्तातली साखर कमी होते. चक्कर येते. एकाग्रतेवर परिणाम होतो. नाश्त्यामध्ये तृणधान्ये, दूध, फळं असवीत पण कॅलरीजचं प्रमाण जास्त असू नये. मासे खाण्याने आपल्याला ओमेगा तीन फॅटी अ‍ॅसिड्स मिळतात. याला जवस किंवा अक्र ोड हा शाकाहारी पर्याय असू शकतो. वृद्धापकाळात स्मृतिक्षय, अल्झायमर्स यांसारखे आजार होऊ नयेत म्हणून जवसाचे तेल, फिश आॅईल, अक्र ोड यांचा आहारात समावेश केल्याची त्याची तीव्रता कमी होते. मेंदूसाठी खेळ-व्यायाम आवश्यकचखेळ-व्यायामासाठी वयाचे बंधन नसते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. ही शरीराच्या इतर अवयवासोबतच मेंदूसाठीही घातकच आहे. मेंदूच्या डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. मुलं जेवढी खेळतील तसा कॉर्पस कलोझम सक्षम होतो. म्हणून मुलांसाठी खेळ- हालचाल- व्यायाम महत्त्वाचा आहे. यामुळे मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो. पेशींना योग्य प्रमाणात आॅक्सिजन मिळतो.