कार्तिकीपूर्वी मंदिर न उघडल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालू; वारकरी संप्रदायाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:05 AM2020-11-09T01:05:53+5:302020-11-09T07:04:12+5:30

शासनाने कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना सहकार्य करावे. प्रत्येक मठात ५० लोक राहण्याची परवानगी द्यावी.

Boycott if elections are not opened before Karthiki | कार्तिकीपूर्वी मंदिर न उघडल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालू; वारकरी संप्रदायाने दिला इशारा

कार्तिकीपूर्वी मंदिर न उघडल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालू; वारकरी संप्रदायाने दिला इशारा

Next

पंढरपूर : शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करू परंतु कार्तिकी एकादशीपूर्वी कुलूपबंद विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडा. सरकारने मंदिराबाबत निर्णय न घेतल्यास सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालू, असा इशारा पंढरपुरात वारकरी संप्रदायाने दिला आहे. कार्तिकी वारीसंदर्भात वारकरी सांप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी रविवारी पंढरपुरात पत्रकार परिषद घेतली.

शासनाने कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना सहकार्य करावे. प्रत्येक मठात ५० लोक राहण्याची परवानगी द्यावी. परंपरा टिकावी यासाठी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नगर प्रदक्षिणा करू द्यावी. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना मदत नाही केली तर पुढील सर्व निवडणुकीत मतदान करणार नाही, असाही इशारा देण्यात आला. यावेळी रामकृष्ण वीर महाराज, राणा महाराज वासकर, भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर, रंगनाथ महाराज राशिनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उपळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.

Web Title: Boycott if elections are not opened before Karthiki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.