शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक हत्याप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: June 5, 2014 20:46 IST

माजी नगरसेवक मनोज शर्मा हत्याप्रकरण; दोघांना अटक; मुख्य आरोपी अजूनही फरार.

मूर्तिजापूर: भारतीय जनता पक्षाचे येथील माजी नगरसेवक मनोज बंसीलाल शर्मा (३५) यांच्या हत्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा दोघांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध घेणे सुरू आहे. मूर्तिजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक मनोज बंसीलाल शर्मा यांची बुधवार, ४ जून रोजी रात्री १०.३० वाजताचे सुमारास पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली. शर्मा हे त्यांच्या मित्रांसोबत रात्री अग्रसेन चौकात बसले असताना एका सशस्त्र टोळीने त्यांच्यावर पाईप, गुप्ती, चाकू आदी शस्त्रांनी वार करून त्यांची निघृर्ण हत्या केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राम जोशी यांनाही मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले. शर्मा यांना गंभीर जखमा झाल्याने त्यांना प्रथम मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्मा यांना मृत घोषित केले.

घटनेच्या रात्री पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू करून, बबनराव शितोडे, गणेश शितोडे यांना अटक केली. तर मुख्य आरोपी बाळा बबन शितोडे (२५), आशिष बबन शितोडे (२२) आणि इतर पाच ते सात जण अद्यापही फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

**शहरात कडकडीत बंद

या घटनेमुळे मूर्तिजापूर शहरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी शहरातील व्यापार्‍यांनी त्यांची व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अकोला येथून सीआरपीएफची तुकडी आणि बोरगाव मंजू व माना येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे.