शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 05:28 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही.

बेळगाव - सीमा प्रश्न म्हणजे कौरव-पांडवांचे युद्ध नाही, दोन्ही बाजूला पांडवच आहेत. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले.बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. हा कार्यक्रम गोगटे रंगमंदिरमध्ये झाला. संजय राऊत म्हणाले, सध्या सीमाप्रश्नाचा लढा न्यायालयात आहे. हा लढा उत्तम प्रकारे लढायला पाहिजे. टोकाचा संघर्ष न करता मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही भाषा, संस्कृती टिकविणे ही प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे. भाषेला शत्रू न मानता त्याचा विकास करण्याचा प्र्रयत्न केला पाहिजे. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल.महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही अशीच भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले. सरकार चालविण्यासाठी धर्माचा आधार घेऊ नये. धर्माचा आधार घेतला तर हिंदुस्थानचा पाकिस्तान, इराण व्हायला वेळ लागणार नाही. आमचं हिंदुत्व गाडगे महाराजांचे आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि हवा असलेल्याला निवारा अशी गाडगे महाराजांची जी भूमिका होती तीच आम्ही पुढे घेऊन चाललोय.कडेकोट बंदोबस्त;राऊत यांचे उत्स्फूर्त स्वागतसंजय राऊत यांच्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात व कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी मराठीतच बोलतोसंजय राऊत म्हणाले, भाषा वाद जरी झाला असला तरी भाषेचा वाद असू नये. कारण आपला देश एकच आहे. कानडी बांधव महाराष्ट्रात जिथ- जिथे राहतात तिथे कानडी शाळांना अनुदान देण्याचे काम आमचे सरकार (महाविकास आघाडीचे) करीत आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आजही आम्ही शुद्ध मराठीतच बोलतो.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbelgaonबेळगावmarathiमराठीKarnatakकर्नाटक