शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सीमा तपासणी नाक्याचे साडेपाच लाख लुटले

By admin | Updated: August 20, 2014 01:04 IST

आंध्र प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमेवरील तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये दुचाकीवरील दोघांनी भरदिवसा लुटून नेले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पाटणबोरीनजीक मंगळवारी घडली.

राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा घडली घटना : युवकाला जबर मारहाणपाटणबोरी (जि. यवतमाळ) : आंध्र प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमेवरील तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये दुचाकीवरील दोघांनी भरदिवसा लुटून नेले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पाटणबोरीनजीक मंगळवारी घडली. प्रवीण राऊत (२२) रा. यवतमाळ असे यातील फिर्यादी युवकाचे नाव आहे. लुटारूंच्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. पांढरकवडा ते आदिलाबाद मार्गावर पिंपळखुटी येथे राज्य शासनाचा अत्याधुनिक चेक पोस्ट अर्थात सीमा तपासणी नाका आहे. सद्भावना कंपनीमार्फत हा नाका चालविला जातो. या कंपनीची ५ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम घेऊन प्रवीण राऊत मंगळवारी सकाळी यवतमाळला जाण्यासाठी निघाला. चेक पोस्टवरून एका स्कुटीवर तो पाटणबोरी येथे आला. परंतु तेलंगणा राज्यात बंद पाळला जात असल्याने आंध्र प्रदेशातून पांढरकवड्याकडे येणारी एकही बस त्याला भेटली नाही. दरम्यान, एका हिरोहोंडा स्प्लेंडर चालकाने त्याला लिफ्ट दिली. परंतु काही दूर अंतर जाताच ढोकी गावानजीक एका बंद ढाब्यामागे नेऊन प्रवीणला लुटण्यात आले. त्याला दगडाने गंभीर जखमी करून त्याच्याकडील रक्कम घेऊन दोन्ही युवक दुचाकीने पांढरकवड्याकडे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा व पाटणबोरी पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. परंतु पोलिसांना या घटनेबाबत संशय वाटत असल्याने त्यांनी फिर्यादीचीच उलटतपासणी चालविली. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. उपरोक्त सीमा तपासणी नाक्यावर सेवा शुल्काच्या नावाखाली प्रत्येक वाहनाकडून ९० रुपये वसूल केले जातात. याशिवाय ओव्हरलोड वाहनांना दंडही आकारला जातो. या वसुलीतून चेक पोस्टवर दररोज दीड ते पावणेदोन लाख रुपये जमा होतात. ही रक्कम सद्भावना कंपनीचा कर्मचारी यवतमाळ येथे जाऊन आयसीआयसीआय बँकेत भरतो. दोन दिवसांची सुटी आल्याने ही रक्कम ५ लाख ६५ हजार एवढी जमा झाली. नेहमी प्रवीण व त्याचा एक साथीदार ही रक्कम घेऊन यवतमाळला जात होते. प्रवीण एसटी बसने तर त्याचा साथीदार इंडिका कारने जात असल्याचे सांगण्यात आले. प्रवीणच्या बयानात विरोधाभास आढळल्याने पोलिसांना घटनेबाबत संशय आहे. रक्कम लुटणारे दोनही युवक अंदाजे ३० वर्ष वयाचे असून त्यातील एकाच्या अंगात लाल टी-शर्ट, पायावर बॅन्डेज आहे. त्याचा वर्ण गोरा असून डोक्यावर टक्कल पडले आहे तर दुसरा युवक सावळा असल्याचे प्रवीणने पोलिसांना सांगितले. सदर बॅगमध्ये ५ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या संपूर्ण १०० रुपयांच्या नोटा होत्या. या भारी बॅगमुळेच आणि जखमी झाल्यामुळे लुटारूंचा प्रतिकार आपल्याला करता आला नाही, असे प्रवीणने पोलिसांना सांगितले. (वार्ताहर)