मुंबई : संपूर्ण विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची त्रेधा उडविली. रब्बी हंगामातील बहरलेली हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी, कापूस, करडई, ही पिके आडवी झाली. दरम्यान, विदर्भात आणखी तीन दिवस हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक होता. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गारा पडल्या आहेत. शेजारच्या अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांतही अवकाळी पावसाने द्राक्षबागांसह पिकांचे नुकसान केले. आंब्याच्या मोहराचेही नुकसान झाले.
वीज पडून एक ठार
यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यात सोमवारी वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाले. तर राळेगाव तालुक्यातील झरगड येथे मजुरांच्या अंगावर वीज पडल्याने पाचजण गंभीर जखमी झाले. वायगाव (ता. उदगीर) येथे अंगावर वीज पडल्याने दिगंबर बेलकुंडे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे.
वादळी पावसाची शक्यता
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह दक्षिणेत वर्धा, यवतमाळ भागात २४ तासांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरण कायम राहून काही ठिकाणी किरकोळ पाऊस होण्याचीही शक्यता आहे.
अधिवेशनात यावर चर्चा होणार का?
अवकळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गव्हाचे पीक भुईसपाट झाले असून द्राक्षासह इतर फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यावर विधिमंडळात चर्चा होणार का, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
Web Summary : Unseasonal rains in Maharashtra severely damaged Rabi crops like chickpeas and wheat. Marathwada experienced hailstorms. One person died due to lightning. Vidarbha is under a yellow alert for further rainfall. Farmers face substantial losses, awaiting government discussion.
Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश ने चना और गेहूं जैसी रबी फसलों को भारी नुकसान पहुंचाया। मराठवाड़ा में ओलावृष्टि हुई। बिजली गिरने से एक व्यक्ति की मौत हो गई। विदर्भ में बारिश के लिए येलो अलर्ट जारी किया गया है। किसानों को भारी नुकसान, सरकार से चर्चा की उम्मीद।