Block of half hour on the Pune-Mumbai expressway on Tuesday | पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी अर्धा तास ब्लॉक
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी अर्धा तास ब्लॉक

पुणे : पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर परंदवाडी येथे पुणे व मुंबई या दोन्ही मार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तुटलेल्या ओव्हरहेड हायर्टेशनचे काम करण्यासाठी २५ जून रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे़. 
२५ जूनला दुपारी एक ते दीड या दरम्यान ३० मिनिटांकरता मुंबईकडे जाणारी व पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे़. द्रुतगती महामार्गावरील ८४़४०० या कामाचे ठिकाणापासून अर्धा किमी अगोदर थांबविण्यात येणार आहे़. मुंबईकडे जाणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रीज येथून जुना पुणे - मुंबई महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़. पुण्याकडे येणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाका येथून जुना पुणे-मुंबई महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे, असे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी कळविले आहे़. 


Web Title: Block of half hour on the Pune-Mumbai expressway on Tuesday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.