शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

कलंकशोभा!

By admin | Updated: February 15, 2017 00:50 IST

आजकाल राजकारणात ‘पण लक्षात घेतो कोण?’ असा कुणी हरी नारायण आपटे यांच्या कादंबरीतील सनातन प्रश्न विचारला तरी कोणी लक्षात घेईलच, असे नाही.

आजकाल राजकारणात ‘पण लक्षात घेतो कोण?’ असा कुणी हरी नारायण आपटे यांच्या कादंबरीतील सनातन प्रश्न विचारला तरी कोणी लक्षात घेईलच, असे नाही. आचार, विचार आणि व्यवहाराच्या पातळीवर हल्लीचे राजकारण खूप पुढे गेले आहे. पुढे सरकणे हे प्रागतिक लक्षण मानले जात असले, तरी हे क्षेत्र त्यास अपवाद ठरावे. गेला बाजार राजकारण आणि तत्त्वाची केव्हाच फारकत झाली असल्याने कोणाकडे किती कलंकित आहेत, यावरून एखाद्या राजकीय पक्षाच्या चारित्र्याचा ‘लसावी’ न काढलेलाच बरा...पूर्वी राजकारण ही सार्वत्रिक जीवनाची शेवटची पायरी असे. आता तीच ‘नामदेव पायरी’ झाल्याने सत्तेचा सोपान गाठणे सहज साध्य झाले आहे. आजवर सामाजिक कार्यातून तयार झालेले कार्यकर्ते राजकारणात येत. त्यामुळे त्यांच्याकडे किमान वैचारिक बैठक, स्वच्छ चारित्र्य आणि वादातीत पक्षनिष्ठा असायची. हल्ली आधी राजकारण आणि नंतर जमले तर समाजकार्य, असा उलटा प्रवास सुरू असल्याने कार्यकर्त्यांचा सामाजिक पिंड शेवटी कोरडा तो कोरडाच राहतो. वैचारिक धारणा आणि धोरणांचा दुष्काळ असल्याने असे राजकारण काळाच्या कसोटीवर टिकाव धरत नाही. मग अस्तित्वासाठी सुरू झालेला संघर्ष शेवटी लाचारीच्या पायरीवर येऊन ठेपतो. गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांची आज प्रकर्षाने आठवण होते. भारदेबुवांचे भाषण म्हणजे निरुपण असायचे. ‘संत महात्म्यांची वाट पुसत’ या ग्रंथात ते म्हणतात, ज्ञान असेल तरच भान येते. स्फूर्र्तींची मूर्ती होते आणि कार्यसिद्धी असेल तर आपोआप प्रसिद्धी मिळते. भारदेबुवा आज असते तर त्यांना हे उलटं लिहावं लागलं असतं. कारण हल्लीच्या राजकारणात ‘आधी प्रसिद्धी मग सिद्धी’ हा मूलमंत्र झाला आहे. राजकारणात ‘हरी’ राहिला नाही म्हणून ते ‘लहरी’ बनले आहे, असे निरीक्षणही भारदे एका ठिकाणी नोंदवितात. ‘हरी’ म्हणजे दीन, दलित, कष्टकरीवर्ग त्यांना अभिप्रेत होता. बाळासाहेब भारदे सलग वीस वर्षे राज्याचे सहकारमंत्री आणि दहा वर्षे विधानसभेचे अध्यक्ष होते. मंत्रिमंडळात घेतल्याची बातमी त्यांनी रेडिओवर ऐकली. शपथविधीसाठी ते एस.टी.ने मुंबईला निघाले. ही बातमी कळताच जिल्हाधिकाऱ्यांनी लाल दिव्याच्या गाडीने त्यांच्या एसटीचा पाठलाग केला. रस्त्यात गाडी अडविली. बाळासाहेबांना गाडीत बसण्याची विनंती केली. यावर ते म्हणाले, तुम्ही आणलेली लाल दिव्याची गाडी आणि एस.टी. दोन्ही वाहने सरकारीच. शिवाय, मी तिकीट काढलेले आहे. तेव्हा तुम्ही परत जा. मी एसटीने वेळेवर पोहोचतो! तात्पर्य काय तर, काळाच्या ओघात भारदेबुवांसारखे निष्काम कर्मयोगी विसराळी पडले आणि हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानींसारखे कलंकित लोक राजकीय कुंडीतील शोभिवंत फुले बनली. सध्या अशा कलंकांचेच दिवस असल्याने कोणाकडे किती, असा हिशेब मांडायची गरज उरलेली नाही. सत्तेच्या हमामात सब नंगे असतील तर त्यांना गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली तरी ओघळांचे तीर्थ थोडेच होणार? या गणंगाकडे ‘इलेक्ट्रोल मेरिट’ं नावाचा अद्भुत असा चिराग असतो. तो घासला की, म्हणे हमखास विजय मिळतो! असे जादुई चिरागवाले अल्लाउदीन सगळ्यांनाच हवे असतात. त्यामुळे भाजपात शंकराचार्यांची जागा गुंडाचार्यांनी घेतली, असा आरोप ‘मातोश्री’वरून झाला असला तरी, त्यांनाही गुंडाचार्यांमध्ये ‘आचार्य’ दिसले, हे काय कमी आहे!-नंदकिशोर पाटील