शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटांनी हादरला निवासी विभाग

By admin | Updated: December 19, 2014 05:07 IST

येथील एमआयडीसी फेज १ मधील ओरेक्स फार्मा लिमिटेड या औषध कंपनीला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

डोंबिवली : येथील एमआयडीसी फेज १ मधील ओरेक्स फार्मा लिमिटेड या औषध कंपनीला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी खाक झाली असून यातील केमिकलचा साठा असणाऱ्या ड्रमचे एकामागून एक असे ७ ते ८ स्फोट झाल्याने या स्फोटाच्या आवाजांनी आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेत शिवनारायण विश्वकर्मा (१९) हा कामगार जखमी झाला आहे.ओरेक्स कंपनीत खोकल्याच्या औषधाचे उत्पादन केले जाते. बुधवारी रात्री १२.३० च्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागली. यावेळी कंपनीत २२ कामगार काम करीत होते. आग लागताच त्यांनी कंपनीबाहेर पलायन केले़ मात्र यातील शिवनारायण या कामगाराला या आगीची झळ बसल्याने तो जखमी झाला. त्यास उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटना घडताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. औषध बनविण्यासाठी लागणाऱ्या टोलविन या घातक रसायनाने या आगीत पेट घेतल्याने मोठे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज इतका प्रचंड होता की बाजूकडील ग्रामीण आणि निवासी विभागाबरोबरच सुमारे ४ ते ५ किलोमीटर परिसरापर्यंतचा परिसर दणाणून गेला होता. सुदैवाने कंपनीच्या भोवती दाट वस्ती नसल्याने आणि कंपनीचे कामगार वेळीच बाहेर पडल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाचे १० बंब आणि २ टँकर यांनी तब्बल ६ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविले. यानंतर सकाळी या कंपनीत पुन्हा आग लागल्याची घटना घडली होती. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)