काळ्य़ा तेलाच्या लाटा!

By Admin | Updated: July 25, 2014 23:49 IST2014-07-25T23:49:35+5:302014-07-25T23:49:35+5:30

अरबी समुद्रातून भरतीच्या पाण्याबरोबर काळे तेल आणि त्या काळ्य़ा तेलाचे तयार झालेले गोळे येऊन थडकले आहेत.

Black oil waves! | काळ्य़ा तेलाच्या लाटा!

काळ्य़ा तेलाच्या लाटा!

जयंत धुळप - अलिबाग
रायगड जिल्ह्यातील उरण, अलिबाग,  मुरुड, श्रीवर्धन या चार तालुक्याना लागून असणा:या अरबी समुद्रातून शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्याबरोबर  काळे तेल आणि त्या काळ्य़ा तेलाचे तयार झालेले गोळे किना:यांवर येऊन थडकले आहेत. या काळ्य़ा तेलामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग काळपट झाला होता, त्याच बरोबर यावेळी समुद्राच्या पाण्यात गेल्यावर अंगावर तेलाचा तवंग चिकटत असल्याचे दिसून आले.
उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किना:यावर हे काळे तेल मोठय़ा प्रमाणात आले आहे. काळ्य़ा तेलाच्या लाटा किना:यांवर येत असल्याची माहिती मिळताच उरणचे तहसिलदार एन.एच. चव्हाण यांनी समुद्र किनारी जावून पाहणी केली. त्यावेळी किना:यावर हे काळे तेल आणि काळ्य़ा तेलाचे गोळे मोठय़ा प्रमाणात पसरल्याचे दिसून आले. दरम्यान हे काळे तेल मुंबई बंदरातून आल्याचे प्राथमिक निष्कर्र्षाती स्पष्ट झाले.  याबाबत खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
पसरलेले काळे तेल क्रुड ऑईल असल्याचाही दावा स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे. बॉम्बे हाय या तेल निर्मिती क्षेत्रतून ते आले असावे, कारण यापूर्वी देखील अशा प्रकारे हे काळे तेल भरतीबरोबर किनारी भागात येण्याचे प्रकार घडल्याची माहिती महाराष्ट्र कोळी व बहुजन समाज संघाचे अध्यक्ष उल्हास महादेव वाटकरे यांनी दिली. या शिवाय जेएनपीटी आणि मुंबई पोर्टमध्ये येणा:या मोठय़ा मालवाहू जहाजांच्या इंजिनाचे वंगण तेल बदलण्याचे काम मुंबईजवळच्या खोल समुद्रात केले जाते आणि बदललेले खराब काळे तेल थेट समुद्रात सोडण्यात येते, असेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. परंतु या प्रकारांवर नौदल, कोस्टगार्ड वा मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रार देखील वाटकरे यांनी केली आहे.
सध्याचा काळ हा माशांच्या प्रजोत्पादनाचा काळ आहे. समुद्रातील मासे किनारी भागात मोठय़ा प्रमाणात अंडी घालतात. नेमक्या याच काळात समुद्राच्या पाण्यात, खाडय़ांमध्ये आणि किनारी भागात काळ्य़ा तेलयुक्त लाटा आल्याने, माशांच्या प्रजोत्पादनावर मोठा विपरित परिणाम होतो. 
8 ऑगस्ट 2क्1क् रोजी मुंबई बंदरात एम.व्ही.-चित्र आणि एम.एस.-खलिजा या दोन महाकाय मालवाहू बोटींची टक्कर होवून  मोठय़ा प्रमाणात काळ्य़ा तेलाचा तवंग रायगडच्या समुद्रात आणि किना:यांवर पसरला होता. यावेळी झालेल्या सागरी प्रदूषणामुळे 2क्1क् मध्ये मत्स्य दुष्काळ निर्माण झाला होता.
गेल्या आठ दिवसांपूर्वी रेवदंडय़ाजवळच्या समुद्रात ‘प्रियंका’ हा 19क्क् टन कच्चे लोखंड घेऊन साळावच्या वेलस्पन जेट्टीवर येणारा महाकाय बार्ज खराब हवामानामुळे समुद्रात रुतले आहे. त्यामध्ये 1 हजार 75क् लिटर हायस्पीड डिङोल आहे तर 8क् लिटर ल्यूब ऑईल आहे. परंतु त्यातून कोणत्याही प्रकारे गळती होत नसल्याची माहिती या निमित्ताने रायगड आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
रुतलेल्या प्रियंका बाजर्च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे यांनी एका बैठकीत घेतला आहे. रुतलेल्या या बार्ज मध्ये 1 हजार 75क् लिटर हायस्पीड डिङोल आहे तर 8क् लिटर ल्यूब ऑईल  काढून घेण्याकरिता सव्रेक्षण करण्यात आले आहे.
 
मुरुडच्या समुद्रकिनारीही थर
4मुरुडच्या समुद्र किना:यावर तेलतवंगाचे थर जमले असून तवसाळकर लॉजपासून जि. प. गेस्ट हाऊसर्पयतचा भाग तवंगाने संपूर्ण माखला आहे.
4दरवर्षी विशेषत: पावसाळी प्लास्टिक कचरा, लाकूडफाटा, तुटलेली जाळी आदि पदार्थ वाहून किना:याला लागतात. या वर्षी मात्र किना:यावर तेलाचे गोळे भरती ओहोटीत वाहूून आल्यामुळे स्वच्छ किनारा खराब झाला आहे.
4किना:यावर तेल मिo्रित वाळू पायाला घट्ट चिकटते. रॉकेलशिवाय तेलाचे डाग नीट स्वच्छ होत नाहीत. मुरुडला नाना-नानी पार्क व जॉगिंग पार्क नसल्यामुळे युवकांसह ज्येष्ठ नागरिकांना सकाळ संध्याकाळ फिरायला जाणो पर्वणी असते. आठ दिवसांपासून तेलाचे तवंग किना:यावर असल्यामुळे भरावाचे दगडही काळेभोर झालेले दिसतात.
4समुद्रात वाहून आलेले तेल हे मासळीच्या ब्रिडींग काळात अत्यंत हानिकारक असून त्यामुळे माशांची पैदास कमी होऊ शकते.
4मेरी टाईम अधिका:यांशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि तवंगाची स्वच्छता करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
 
बेफिकीर पर्यटक
अलिबागच्या समुद्रकिनारी आणि पाण्यात देखील काळ्या तेलाचे तवंग दिसत असताना,  समुद्रात पोहायला जावू नका असे किना:यावरील स्थानिक नागरिक सांगत असताना देखील, ते नाकारुन पुण्यातून आलेल्या एका पर्यटक कुटुंबातील चार तरुणी पाण्यात पोहायला गेल्या होत्या. मुरुडमध्ये अलिकडेच सहा पर्यटक समुद्रात बुडाल्याच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर या चौघा मुलींबाबत किना:यावरील नागरिक संताप व्यक्त करीत होते.
 
4उरण तालुक्यातील पिरवाडीच्या किना:यावर सध्या मोठय़ा प्रमाणात तेलाचा तवंग दिसत आहे. किना:यावर मासेमारी करणा:या स्थानिकांना मागील अनेक दिवसांपासून हा त्रस सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हे ऑईल कसे आणि कोठून आले याची कोणतीही माहिती नाही. याठिकाणी तेलाचा तवंग इतक्या मोठय़ा प्रमाणात आहे की, किना:यावर चालताना पाय पूर्णत: काळे होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणो आहे. 
4अचानक आलेल्या तेलाच्या तवंगामुळे अख्खा पिरवाडी समुद्र किनाराच काळवंडला आहे. फर्नेस ऑईलसारख्या भासणा:या या ऑईलचे छोटे छोटे गोळे संपूर्ण किना:यावर आणि परिसरात दिसून येत आहे. या प्रकारामुळे पर्यटकांना वाळूवरून चालण्याच्या आनंदापासून लांबच रहावे लागत आहे. 
 
4या ऑईलच्या गोळय़ांमुळे किना:यावर येणारी मासळी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ताच झाली असल्याने स्थानिक मासेमारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात नागावचे माजी उपसरपंच स्वपAील माळी यांनी, या किना:यावर नेहमीच असे काही ना काही घडत असल्याचे सांगितले.
4या संपूर्ण किना:यालाच धूप प्रतिबंधक बंधा:याची गरज आहे. या किना:यावर शनिवार, रविवारी मुंबई ठाणो, नवी मुंबई, पुणो आणि पनवेल आदी परिसरातून मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. तेल गळतीमुळे पर्यटकांचा ओघ कमी होण्याची शक्यता माळी यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: Black oil waves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.