अजित पवारांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, त्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे आगीमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर शंकांचे मोहोळ उठले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. याबद्दल बोलताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले की, या घटनेचा तपास सर्वांगाने होत आहे की नाही, याची माहिती आम्हालाही मिळायला हवी.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या अपघाती मृत्युचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री फडणवीसांना देण्यात आले.
याबद्दल प्रफुल पटेल म्हणाले की, "अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर आम्हालाही माहिती मिळायला हवी की, या प्रकरणाचा सर्वांगाने आणि योग्य दिशेने तपास सुरू आहे की नाही. आज एएआयबी अपघाताच्या तांत्रिक मुद्द्यांचा तपास करत आहे."
'तपासणीसाठी ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठवणार'
"मी ऐकलं आहे की ब्लॅक बॉक्स अमेरिकेला तपासासाठी पाठवला जाणार आहे. कदाचित इथे त्याची पूर्णपणे तपासणी केली जाऊ शकत नाही. राज्य सरकारनेही याचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे", असेही पटेल यांनी सांगितले.
"इतक्या मोठ्या नेत्याचा इतका भयंकर अपघात होतो, त्यामुळे आम्हाला वाटतेय की, याच्या तपासाची सर्व माहिती मिळायला हवी. सीबीआय एक विश्वासार्ह संस्था आहे आणि सीबीआयकडून याचा तपास केला गेला, तर जी वस्तुस्थिती आहे. त्याचीही माहिती मिळायला हवी. सीबीआय हे काम करू शकते", असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.
रोहित पवारांच्या मनात अनेक शंका
आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) तिसरी पत्रकार परिषद घेऊन अपघाताबद्दलच्या आणखी शंका उपस्थित केल्या.
"अजितदादा यांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर तपासाला काहीशी गती आली असली तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास होत नाही", असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
"गेल्या काही दिवसांत अपघाताबाबत VSR कंपनीची संशयास्पद भूमिका, कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे, विमान कंडीशन, पायलटची मनःस्थिती, ब्लॅक बॉक्समधील डेटाबाबत निर्माण झालेल्या शंका, तपासाला वेगळं वळण देण्यासाठी होणारा मानवी हस्तक्षेप आदी अनेक मुद्दे निदर्शनास आले आहेत", असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
"हा तपास निष्पक्ष होण्यासाठी देशाबाहेरील दोन एजन्सीची मदत घेण्याची आणि देशाचे व या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील आणि पक्षातील प्रतिनिधी आणि काही तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी", अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's death in a plane crash, questions arise. The black box, possibly damaged, will be sent to the US for examination. Prafulla Patel emphasizes the need for a thorough investigation, potentially by the CBI, due to suspicions surrounding the accident. Rohit Pawar also voices concerns about the investigation's pace and transparency.
Web Summary : अजित पवार की विमान दुर्घटना में मौत के बाद सवाल उठ रहे हैं। ब्लैक बॉक्स, जो क्षतिग्रस्त हो सकता है, को जांच के लिए अमेरिका भेजा जाएगा। प्रफुल्ल पटेल ने दुर्घटना के आसपास के संदेहों के कारण सीबीआई द्वारा गहन जांच की आवश्यकता पर जोर दिया। रोहित पवार ने भी जांच की गति और पारदर्शिता पर चिंता व्यक्त की।