शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचं धक्कातंत्र, उमेदवारी दिलेले रामराव वडकुते, माया इवनाते कोण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:59 IST

Maharashtra Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारी यादीमध्ये ज्येष्ठ नेते विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नावांचा अपेक्षेप्रमाणे समावेश असला तरी उर्वरित दोन उमेदवार निवडताना भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपा महाराष्ट्रातून कुणाकुणाला उमेदवारी देणार याबाबत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, उमेवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचा एक दिवस उरला असताना आज भाजपाने राज्यसभेसाठीच्या आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये ज्येष्ठ नेते विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नावांचा अपेक्षेप्रमाणे समावेश असला तरी उर्वरित दोन उमेदवार निवडताना भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. भाजपाने चर्चेतील अनेक नावे बाजूला ठेवत रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने उमेदवारी दिलेले रामराव वडकुते आणि माया ईवनाते हे कोण आहेत. तसेच त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द कशी आहे, हे आपण जाणून घेऊयात.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी दिलेले रामराव वडकुते हे माजी आमदार आहेत. तसेच ते सध्या पक्षाचे हिंगोलीमधील जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रामराव वडकुते यांनी आपल्या रायकीय कारकिर्दीची सुरुवात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच भाजपाने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.

तर भाजपाने उमेदवारी दिलेल्या माया चिंतामण इवनाते ह्या नागपूरच्या माजी महापौर आहेत. आदिवासी समाजातील नेत्या असलेल्या या इवनाते यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून विजय मिळवला होता.  राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याचादेखील ईवनाते यांच्याकडे अनुभव आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. तर या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. 

  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's surprise Rajya Sabha picks: Who are Ramrao Wadkute, Maya Ivnate?

Web Summary : BJP's Rajya Sabha nominations surprised many by choosing Ramrao Wadkute, ex-NCP, now Hingoli district head, and Maya Ivnate, Nagpur's ex-mayor from tribal community. Veteran leaders like Vinod Tawde and Ramdas Athawale were also nominated, while several expected candidates were overlooked.
टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026Hingoliहिंगोलीnagpurनागपूर