भाजपचं गणित कच्चं; ट्विटर फॉलोअर झाले एक लाख, यांना वाटलं दहा लाख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 18:45 IST2018-05-06T18:45:29+5:302018-05-06T18:45:29+5:30
या चुकीच्या ट्विटमुळे महाराष्ट्र भाजपाला टीकेला सामोर जावे लागत आहे.

भाजपचं गणित कच्चं; ट्विटर फॉलोअर झाले एक लाख, यांना वाटलं दहा लाख!
मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेचे गणित जुळवण्यात माहीर असलेल्या भाजपचं गणित कच्चं असल्याचं एका पोस्टमुळे समोर आलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलला फॉलो करणाऱ्यांची संख्या एक लाख इतकी आहे. मात्र प्रसिद्धीच्या मोहात असलेल्या भाजपने चक्क दहा लाख लोक भाजपाला ट्विटरवर फॉलो करत असल्याचा दावा करत त्यांचे आभार मानले. नेटिझन्सनी प्रतिक्रियांमधून 'शाळा' घेतल्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली आणि आधीची पोस्ट त्यांनी डिलीट करून टाकली.
या चुकीच्या ट्विटमुळे महाराष्ट्र भाजपाला टीकेला सामोर जावे लागत आहे. नेटीझन्सनी त्यांचा खरपूस समाचार घेत आहेत. हे ट्विट भाजपाने हटवले असले तरी त्याचे प्रिंट स्क्रीन सोशल मीडियावर व्हायरल झालेत.