शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या मद्यपी कार्यकर्त्याचा गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 7, 2014 08:51 IST

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या एका मद्यपी युवकाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला

पुणे : भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या एका मद्यपी युवकाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गडकरींच्या भोवती असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यास वेळीच रोखले आणि चांगलाच चोप दिला.मद्यपी तरूणाचे नाव भरत कराड असून तो खासगी पेट्रोल पंपावर कामाला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील तो रहिवाशी आहे. गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकारानंतर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भरत यास पोलिसांनी अटक केल्यानंतर सभा सुरळीत होऊन गडकरी पुढील सभेसाठी निघून गेले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गडकरी यांची सोमवारी सायंकाळी कोथरूड येथील शिक्षकनगर येथे सभा होती. गडकरी व्यासपीठावर जाताना, भरतने त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे तो गडकरींजवळ जाऊ शकला नाही. मात्र त्याने अचानक हातात बूट घेऊन तो गडकरींवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला रोखले आणि त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.कोथरूड पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भरत याने गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी असलेल्या पोलीस तसेच कार्यकर्त्यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. भरतने मद्यप्राशन केलेले होते. रात्री उशिरापर्यंत भरतची चौकशी सुरू होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)